(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 खेळण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; कधी, कुठे रंगणार सामना?
India vs England, 1st T20I: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ इंग्लडशी पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी साउथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाऊल (Rose Bowl) क्रिकेट मैदानात उतरणार आहे.
ENG vs IND, 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला (England Vs India) आजपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ इंग्लडशी पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी साउथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाऊल (Rose Bowl) क्रिकेट मैदानात उतरणार आहे. कोरोनामुळं बर्मिंगहॅम कसोटीला मुकावं लागलेल्या रोहित शर्माचा पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. याचदरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी, कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-20 सामना आज (गुरुवार, 7 जुलै) साउथहॅम्प्टन येथील एजिस बाउल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला रात्री 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारताचा टी-20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत कृष्णा बुमराह, ऋषभ पंत.
इंग्लंडचा टी-20 संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन फोक्स, जॅक लीच, अॅलेक्स लीस, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅटी पॉट्स, ऑली पोप, जो रूट.
हे देखील वाचा-