(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WI vs IND: वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहितला विश्रांती, धवनकडं कर्णधारपद!
India’s squad for ODI series against West Indies: इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ या महिन्याच्या अखेर वेस्ट इंडीजचा संघ दौरा करणार आहे.
India’s squad for ODI series against West Indies: इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ या महिन्याच्या अखेर वेस्ट इंडीजचा संघ दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. येत्या 22 जुलै 2022 पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे. तर, शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा टी-20 संघ-
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-