एक्स्प्लोर

Ind vs Ban 1st Test Live : बांगलादेशने जिंकली नाणेफेक; लाल मातीच्या खेळपट्टीत, रोहितने 3 वेगवान गोलंदाज अन् 2 फिरकीपटूंना दिली संधी

India vs Bangladesh 1st Test Day 1 : भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे.

India vs Bangladesh LIVE 1st Test Day 1 : भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने संघात कोणताही बदल केलेला नाही. बांगलादेशने 3 वेगवान गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील या लाल मातीच्या खेळपट्टीत भारत 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज, अश्विन आणि जडेजा यांचा भारतीय प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

या सामन्यातून ऋषभ पंत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो 632 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. 74 गुण आणि 68.52 पीसीटीसह भारत WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया 90 गुण आणि 62.50 पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे -

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघाची प्लेइंग इलेव्हन : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.

लाल मातीची खेळपट्टी

लाल मातीची खेळपट्टी कमी पाणी शोषून घेते आणि त्यामुळे ती लवकर कोरडे होते. तुमच्या लक्षात आले असेल की, कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसापर्यंत खेळपट्टीमध्ये मोठी भेगा पडतात, कारण लाल माती कोरड्या स्वभावामुळे लवकर फुटू लागते.

लाल मातीच्या खेळपट्टीवर सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना भरपूर उसळी मिळते, पण मातीला तडे जाऊ लागल्याने फिरकी गोलंदाजीमध्ये अधिक वळण दिसून येते. पहिल्या 2 दिवसात फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे, परंतु शेवटच्या 2-3 दिवसांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व सुरू होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget