(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Under 19 world Cup 2021: आशियाई चषकासाठी भारताच्या अंडर-19 संघाची घोषणा, जुन्नरच्या कौशल तांबेचा संघात समावेश
Asia Under 19 world Cup 2021: आशिया अंडर-19 चषक स्पर्धेला येत्या 23 डिसेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे.
Asia Under 19 World Cup 2021: आशिया अंडर-19 चषक स्पर्धेला येत्या 23 डिसेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ज्युनियर क्रिकेट निवड समितीतीतर्फे भारतीय संघातील 20 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आलीय. यासह पाच राखीव खेळाडूंचाही समावेश करण्यात आलाय. या स्पर्धेत यश धुल (Yash Dhull) भारतीय अंडर-19 संघाचं नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेचाही (Kaushal Tambe) 20 खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघातील 20 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 5 राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. असा एकूण 25 खेळाडूंचा संघ स्पर्धेपूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीच्या सराव शिबिरात सहभागी होईल. दरम्यान, 11 ते 19 डिसेंबरपर्यंत ही सराव शिबीर पार पडणार आहे. 2022 च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यापार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.
भारतीय अंडर-19 संघ
हरनूर सिंह पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एस.के. राशिद, यश धुल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधु, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवि कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारेख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासु वत्स.
राखीव खेळाडूंची यादी
आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह राठोड,
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- MS Dhoni: मॅच फिक्सिंग प्रकरणात हायकोर्टाचा महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा
- Virat Kohli Captaincy Controversy: विराटनं कर्णधारपद सोडलं की त्याला हटवलं? सौरव गांगुलींनी दिली महत्वाची माहिती
- Vinod Kambli: तोतया बँक अधिकाऱ्याकडून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींची फसवणूक, केवायसी अपडेटच्या नावाखाली लाखो रुपये लुटले