एक्स्प्लोर

Virat Kohli Captaincy Controversy: विराटनं कर्णधारपद सोडलं की त्याला हटवलं? सौरव गांगुलींनी दिली महत्वाची माहिती

भारताचा सलामीवर रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी-20 संघाचं एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलंय. तर, विराट कोहलीकडं (Virat Kohli) कसोटी संघाचं कर्णधारपदं सोपवण्यात आलंय.

Virat Kohli Captaincy Controversy: भारताचा सलामीवर रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी-20 संघाचं एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आलंय. तर, विराट कोहलीकडं (Virat Kohli) कसोटी संघाचं कर्णधारपदं सोपवण्यात आलंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) याबाबत बुधवारी माहिती दिली. टी-20 विश्वचषकापूर्वी विराटनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरु झालाय. ट्विटरवर नेटकऱ्यांकडून बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली जात आहे. यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. विराटनं कर्णधार सोडलं की त्याला हटवण्यात आलं? यावर त्यांनी भाष्य केलंय. 

एएनआय वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणामध्ये गांगुली म्हणाले की, "क्रिकेट बोर्ड आणि संघ निवड समितीने मिळून रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतलाय. विराटला टी-20 संघाचं कर्णधारपद न सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार असणे चुकीचे आहे, असे निवड समितीला वाटते. यापुढे रोहित शर्मा मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व करेल. तर, विराट कोहली कसोटी संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. याबाबत मी बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून आणि मुख्य निवड समितीने देखील विराटला हे सांगितले आहे", असं गांगुली म्हणाले. तसेच "मर्यादित षटकांत कर्णधार म्हणून विराट कोहलीनं दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो," असंही गांगुली यांनी म्हटलंय. 

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपासून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्व क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे, याची बीसीसीआयला खात्री आहे, असाही विश्वास गांगुलींनी व्यक्त केलाय. 

विराट कोहलीनं आतापर्यंत 254 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं 59.07 च्या सरासरीनं 12 हजार 169 धावा केल्या आहेत. यात 43 शतक आणि 62 अर्धशतकाचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे. कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget