Ind vs Ban : इशान किशनपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत, 'या' खेळाडूंना BCCIने पुन्हा एकदा डावललं
India vs Bangladesh 1st Test : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
India Squad for the 2nd Test Against Bangladesh : बांगलादेश दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला सुरू झाला, जो चौथ्या दिवशीच संपला. भारताने पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान असे चार खेळाडू आहे जे संघाची घोषणा झाल्यानंतर नाराज झाले, कारण त्यांना वाटले होते की, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांचा संघात समावेश केला जाईल.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताकडून जो संघ खेळला होता, तोच संघ दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळणार आहे. अशा स्थितीत इशान किशन, श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि संजू सॅमसन यांची दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात निवड झाली नाही. हे खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळत आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याचा संघात समावेश होईल, अशी अपेक्षा होती.
इशान किशन : दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इशान किशन इंडिया सी साठी दुसरा सामना खेळत आहे. आतापर्यंत त्याने 4 डावात 44.33 च्या सरासरीने 133 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
श्रेयस अय्यर : श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया डी संघासाठी 3 सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 6 डावात 25.66 च्या सरासरीने 154 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
खलील अहमद : खलील अहमदने दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया ए संघाकडून 2 सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 4 डावात 21.66 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आहेत.
संजू सॅमसन : संजू सॅमसनने दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये इंडिया डी साठी 2 सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 4 डावात 49.00 च्या सरासरीने 196 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
हे ही वाचा -