एक्स्प्लोर

चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण

ICC World Test Championship 2023-25चा अंतिम सामना 11 जून 2025 रोजी खेळवला जाणार आहे. लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर हा सामना होणार आहे.

India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावरील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती मॅचेस जिंकावे लागतील हे जाणून घेऊया...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाने आपली पकड आणखी मजबूत केली. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे 86 रेटिंग गुण झाले आहेत. 71.67 च्या या विजयाच्या टक्केवारीसह टीम इंडिया आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने वेस्ट इंडिजचा 1-0 आणि इंग्लंडचा 4-1 अशा फरकाने पराभव केला होता. आता टीम इंडियाने बांगलादेशला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला सध्या बांगलादेशविरुद्ध 1, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामना खेळायचा आहे. टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसोबत केवळ 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

आता टीम इंडियाला किती सामने जिंकायचे?

आयसीसीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील 9 पैकी किमान 6 सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत बांगलादेशविरुद्ध 1 आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर, संघाला 5 सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये असणे आवश्यक आहे. भारताने 5 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.

इतर संघांची काय आहे स्थिती?

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 4 सामने जिंकावे लागतील किंवा 3 सामने जिंकावे लागतील आणि 1 सामना अनिर्णित ठेवावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट संघ तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याचे 8 सामने बाकी आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडला 6 सामने जिंकावे लागतील किंवा 5 सामने जिंकावे लागतील आणि 1 अनिर्णित ठेवावा लागेल.

हे ही वाचा -

IND VS BAN 2nd Test : बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी जिंकताच BCCIची मोठी घोषणा! दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूंना दिली संधी, कोण गेलं बाहेर?

अश्विनला दूर ठेवू शकत नाही, पंतला पाहणे हा एक उत्तम अनुभव; विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सव
प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सवाल
15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Andhericha Raja Visarjan : वर्सोव्यातील समृद्रात तराफा उलटला, अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाला गालबोटABP Majha Headlines : 04 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athwale On Prakash Amedkar: वेळ आल्यास माझं मंत्रिपदही प्रकाश आंबेडकरांना देईनAndheri Raja Visarjan Accident : अंधेरी राजा' च्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सव
प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सवाल
15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
Embed widget