IND VS BAN 2nd Test : बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी जिंकताच BCCIची मोठी घोषणा! दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूंना दिली संधी, कोण गेलं बाहेर?
BCCI Announces India Squad For 2nd Test vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Team India Squad For Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करताना बीसीसीआयने कोणताही बदल केलेला नाही. पण रोहित शर्माची इच्छा असेल तर तो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.
केएल राहुलला पुन्हा मिळाली संधी
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बांगलादेश कसोटी मालिकेतून प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलबद्दल सांगायचे तर, पहिल्या कसोटी सामन्यातील त्याची कामगिरी काही खास नव्हती. मात्र त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) September 22, 2024
India retain same squad for 2nd Test against Bangladesh.
More Details 🔽 #TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBankhttps://t.co/2bLf4v0DRu
सरफराज खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?
सरफराज खानचा पण या संघात समावेश केला गेला आहे. अशा स्थितीत बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सरफराज खानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. सरफराज खानने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि अर्धशतकी खेळी खेळली होती.
बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यात भारतीय संघाने 280 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशविरुद्धच्या या शानदार विजयासह भारताने एक अशी कामगिरी केली आहे ज्याची चाहत्यांना 92 वर्षांपासून प्रतीक्षा होती.
रोहित शर्मा आणि कंपनीने चेन्नईत खेळली गेलेली कसोटी जिंकून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय कसोटीतील भारताचा हा 179 वा विजय आहे. टीम इंडियाने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 580 सामने खेळले आहेत आणि ही पहिलीच वेळ आहे की विजयाचा आकडा पराभवापेक्षा जास्त झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.