Women Asia Cup 2022: पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचं लोटांगण; टीम इंडिया 124 वर ऑलआऊट!
शेल्हेट आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारताला 13 धावांनी पराभूत केलं.
Women Asia Cup 2022: महिला आशिया चषकातील तेराव्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट महिला संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतानं (India Women vs Pakistan Women) लोटांगण घातलंय. शेल्हेट आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारताला 13 धावांनी पराभूत केलं. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली.भारतीय संघ अवघ्या 124 धावांवर ऑलआऊट झाला.
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या डावातील चौथ्याच षटकात मेघनाच्या रुपात भारताला मोठा धक्का बसला. त्यानंतर सहाव्या षटाकातील दुसऱ्याच चेंडूवर जेमिमाह रॉड्रिग्ज 7 चेंडूत 2 धावा करून बाद झाली. स्मृती मानधनाही स्वस्तात माघारी परतली. तिनं 18 चेंडूत 17 धावा केल्या. भारतासाठी रिचा घोषनं सर्वाधिक 26 धावांचं योगदान दिलं. भारतीय संघ 19.4 षटकात 124 धावांवर ऑलआऊल झाला. पाकिस्तानकडून नसरा संधूनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर,सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
ट्वीट-
Solid performance from Pakistan to beat India at #WomensAsiaCup2022 👏#INDvPAK | Scorecard: https://t.co/q7hQyhU2pZ pic.twitter.com/BjK7v5mqBl
— ICC (@ICC) October 7, 2022
भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील पहिल्या सहा षटकात भारतानं चांगली गोलंदाजी केली. पाकिस्ताननं पावरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावून 33 धावा केल्या. पूजा वस्त्राकरनं भारताला पहिल यश मिळवून दिलं. त्यानंतर सहाव्या षटकात दीप्ती शर्मानं पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. कर्णधार बिस्माह मारूफन आणि निदा डारनं पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी पाकिस्तानची धावसंख्या 100 पार नेली. दरम्यान, भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूनं बिस्माहला आऊट करून पाकिस्तानच्या संघाला चौथा झटका दिला. पाकिस्तानची पाचवी विकेट्सही लवकर पडली. त्यानंतर पूजा वस्त्राकरनं आलिया रियाजला आऊट केलं. पाकिस्ताननं 20 षटकात 6 विकेट्स गमावून भारतासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून पूजा वस्त्राकरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्माला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, रेणुका सिंहच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
हे देखील वाचा-