(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022 : गणपती बाप्पा मोरया! मिशन वर्ल्डकपपूर्वी कॅप्टन रोहितने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, विजयासाठी घेतला बाप्पाचा आशिर्वाद
Team India for T20 World Cup : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून आगामी टी20 विश्वचषक रंगणार आहे, रोहित शर्मा कर्णधार असून केएल राहुल उपकर्णधार असणार आहे.
Rohit Sharma for T20 World Cup : टी20 विश्वचषकाचा महासंग्राम (T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्त्व हिटमॅन रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. दरम्यान रोहितसह भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला असून तिकडे जाण्यापूर्वी रोहितनं आवर्जून दादरच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. मुंबईकरांसाठी दादरच्या सिद्धिविनायकाशी अगदी भावनिक नातं असल्यानं रोहितनंही इतक्या मोठ्या स्पर्धेला जाण्यापूर्वी आवर्जून बाप्पाचा आशिर्वाद घेतला.
सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी रोहित सहकुटुंब मंदिरात पोहोचला होता. त्यामुळे त्याच्यासोबत पत्नी रितिका, मुलगी समायरा देखील सोबत होती. रोहित निळ्या रंगाच्या सिंपल पण ट्रेडिशनल कुर्त्यात दिसून आला. रोहितचे दर्शन घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Pic of the day ❤️👑
— K U N A L ⚓ (@kuna1___) October 6, 2022
Hindu sher Rohit Sharma in temple with his family. Before living to Australia for world cup.💗❤️
Let's bring the trophy home @ImRo45 👑🏆 #RohitSharma #BCCI #Indiancricketteam #WorldCup2022 #missionworldcup#Rohit pic.twitter.com/xyGq668PNw
विश्वचषकापूर्वी 4 सराव सामने खेळणार
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न इथं होणार आहे. टीम इंडिया आधी पर्थला पोहोचेल. 13 तारखेपर्यंत इथे सराव शिबिर होणार आहे. यादरम्यान दोन सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सराव सामने बीसीसीआयनेच आयोजित केले आहेत, जे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवले जातील. हे दोन्ही सामने 10 आणि 12 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. यानंतर भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये दोन आयसीसी सराव सामनेही खेळायचे आहेत. हे दोन्ही आयसीसी सराव सामने 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळवले जाणार आहेत.
सराव सामने
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 10 ऑक्टोबर
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन :12 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया : 17 ऑक्टोबर
न्यूझीलंड: 19 ऑक्टोबर
टी-20 विश्वचषक 2022 साठी16 संघ पात्र
आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएईनं आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
हे देखील वाचा-