एक्स्प्लोर

IND W vs AUS W: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-20 सामना गमावला; कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितलं पराभवाचं कारण

Australia Tour Of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India Women vs Australia Women) बुधवारी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Australia Tour Of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India Women vs Australia Women) बुधवारी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 नं पिछाडीवर गेलाय. तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) मोठी प्रतिक्रिया दिलीय. या सामन्यात भारतीय फलंदाज स्ट्राईक रोटेट करू न शकल्यानं भारताला पराभव स्वीकारावा लागलाय, असंही हरमनप्रीत कौरनं म्हटलंय. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 173 धावाचं लक्ष्य भारतीय संघ गाठू शकत होती. पण भारतीय संघानं बरेच निर्धाव चेंडू खेळल्यानं संघ निर्धारित 20 षटकात सात विकेट्स गमावून 151 धावाच करू शकला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 172 धावांवर रोखल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही सामना जिंकू शकतो. पण मला वाटतं आम्ही काही षटकांमध्ये सहा पेक्षा कमी धावा केल्या, ज्याची आम्हाला किंमत मोजावी लागली. चौकार मारल्यानंतर आम्ही बरेच डॉट बॉल खेळलो, आम्हाला स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती. पण तसं झालं नाही.

शेफाली वर्माची अर्धशतकी झुंज व्यर्थ
शेफाली वर्मा (41 चेंडूत 52 धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (27 चेंडूत 37 धावा) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं दोन विकेट्स गमावून 106 धावा केल्या. दोघांनीही अवघ्या 8.4 षटकांत 73 धावा जोडल्या होत्या. ज्यामुळं भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला. मात्र, शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर भारताची सर्वात मोठी अपेक्षा असलेली ऋचा घोषही मोठा फटक खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौरनं एका बाजूनं एकाकी झुंज सुरू ठेवली. पण भारताला यश मिळवून देण्यास ती अपयशी ठरली. यावर हरमनप्रीत कौर म्हणाली की,  “आम्हा दोघांनाही शेवटपर्यंत टिकून राहायचं होते पण आम्हाला चौकारही मारायचे होते आणि कधी कधी असं खेळताना तुम्ही विकेट गमावता."

अंजली सरवानी, रेणुका सिंहच्या गोलंदाजीचं कौतूक
अंजली सरवानी आणि रेणुका सिंह यांच्या गोलंदाजीचं कौतुक करताना हरमनप्रीत कौर  म्हणाली, अंजली सरवानी आणि रेणुका सिंह ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहेत, हे उल्लेखनीय आहे. त्याच्या गोलंदाजीनं आम्ही प्रभावित झालो आहोत. 

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर कर्णधार अॅलिसा हिली काय म्हणाली?
"ऑस्ट्रेलिया संघाची टॉप ऑर्डर डगमगताना दिसली. पण मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरत चांगली फलंदाजी केली. एलिस पेरीनं शानदार खेळी केली", असं  अॅलिसा हिली म्हणाली. पॅरी 75 धावांची खेळी करणारा 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Rains: नोव्हेंबरमध्येही पावसाचा जोर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, IMD चा इशारा.
Mission Mumbai: भाजपची 'आवाज मुंबईकरांचा' मोहीम, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिम
Three Language Formula: हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून करावी डॉ. नरेंद्र जाधवांचा इशारा
BMC Polls : Piyush Goyal अॅक्शन मोडमध्ये, मुंबईतील विकास कामांचा आढावा
Kabutar Khana Row: 'आम्हाला नवे कबूतरखाने नको', दादर कबूतरखान्यासाठी जैन मुनींचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
Stock in Focus : NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Embed widget