एक्स्प्लोर

INDW vs AUSW : शेफाली वर्माची अर्धशतकी झुंज व्यर्थ, तिसऱ्या टी20 मध्ये भारताचा 21 धावांनी पराभव

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिलांविरुद्ध सुरु टी20 मालिकेत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिके 2-1 ची आघाडी घेतली आहे.

IND W vs AUS W 3rd T20: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर (India vs Australia Women Series) आहे. पाच टी20 सामने दोन्ही संघात खेळवले जात आहेत. आजही तिसरा टी20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला गेला. भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) पार पडलेला हा तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 173 धावाचं आव्हान भारतासमोर ठेवलं. जे पार करताना भारताने झुंज देण्याचा प्रयत्न केला, शेफाली वर्माने अर्धशतक ठोकलं पण तिची झुंज अखेर व्यर्थ गेली आणि सामना भारत 20 षटकात 151 धावाच करु शकला आणि सामना भारताने 21 धावांनी गमावला.

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी दमदार फलंदाजी करत भारतासमोर एक तगडं लक्ष्य ठेवलं. यावेळी एलिस पेरीने सर्वाधिक 75 धावांची तगडी खेळी केली. याशिवाय बेथ मूनीने 30 आणि ग्रेस हॅरिसने 41 तर केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नसली तरी या तिघींचं योगदान पुरेसं असल्यानं भारतासमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला. भारताकडून दिप्ती शर्मा, देविका वैद्य, अंजली सरवाणी आणि रेणुका सिंह या चौघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.

शेफाली-हरमनप्रीतची भागिदारी अयशस्वी

भारताची सुरुवात खास झाली नाही. स्मृती मानधना 1 तर जेमिमा 16 धावा करुन बाद झाली. त्यानंतर शेफाली आणि हरमनप्रीत यांनी चांगली भागिदारी केली. पण दोघी विजयापर्यंत भारताला घेऊन जाऊ शकले नाहीत. शेफालीने 52 धावा तर हरमनप्रीतने 37 धावा केल्या. दोघी बाद झाल्यावर अखेर दीप्ती शर्माने 25 धावा करत सामना जिंकवण्याचे सर्वोत्परी प्रयत्न केले. पण ती बाद झाल्यावर भारताने सामना जवळपास गमावला होता. अखेर 20 षटकांत भारत 151 धावा करु शकला आणि सामना 21 धावांनी भारताने गमावला. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसरा सामनाा भारताने सुपर ओव्हरच्या मदतीनं जिंकत मालिकेत बरोबरी साधली. पण आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 2-1 ची आघाडी मालिकेत घेतली आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Embed widget