(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI: पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेकडं सर्वांचं लक्ष!
IND vs WI: या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना विश्रांती देण्यात आलीय.
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमधील (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हलच्या (Queen's Park Oval) पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर (Port of Spain) खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना विश्रांती देण्यात आलीय. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ दोन विश्वविक्रम मोडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ज्यात पाकिस्तानचा एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम आहे. तसेच एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही भारतीय संघ आपल्या नावावर नोंदवू शकतो.
भारतानं 2007 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत एकही मालिका गमावली नाही. भारतानं गेल्या 15 वर्षात वेस्ट इंडीजला 11 वेळा पराभूत केलंय. एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याऱ्या संघाच्या यादीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. पाकिस्ताननं 1996 पासून 2020 पर्यंत झिम्बॉब्वेविरुद्ध सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यास विश्वविक्रमाला गवसणी घालेल.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकणारे संघ-
क्रमांक | संघ | विरुद्ध संघ | विजयी मालिका |
1 | पाकिस्तान | झिम्बॉव्वे | 11 |
2 | भारत | वेस्ट इंडीज | 11 |
3 | पाकिस्तान | वेस्ट इंडीज | 10 |
4 | दक्षिण आफ्रिका | झिम्बॉव्वे | 09 |
5 | भारत | श्रीलंका | 09 |
एकाच मैदानावर सर्वाधिक विजय
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना क्वीन्स पार्क ओव्हलच्या पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानात भारतानं 11 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघ एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरेल.
हे देखील वाचा-
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
- Coronavirus : केएल राहुलला कोरोनाची लागण, वेस्ट विंडिज दौऱ्यातून बाहेर?