IND Vs SL: विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही? स्टार ऑलराऊंडरचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता
IND Vs SL: वेस्ट इंडीज विरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी भिडणार आहे.
IND Vs SL: वेस्ट इंडीज विरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. लवकरच श्रीलंकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. या आगामी टी-20 मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तर, भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला. त्याचवेळी, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सध्याच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही.आता रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतून चार महिन्यांनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये प्रदीर्घ पुनर्वसनानंतर रवींद्र जडेजा लखनौला पोहोचला आहे. येथे तो क्वारंटाईनमध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिला सामना 24 फेब्रुवारीला लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे.
विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 24 फेब्रुवारीला पहिल्या टी-20 सामन्यानं होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचे दोन सामने धर्मशाला येथे 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी खेळवले जाणार आहेत. या मालिकेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. तर, कसोटी मालिकेत तो संघाचा भाग असणार आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI: आतंरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आवेश खानला पदार्पणाची संधी
- IND vs WI 2nd T20: दुसऱ्या टी-20 पूर्वी वेस्ट इंडीजची धाक-धूक वाढली; 'या' आक्रमक खेळाडूची संघात ऍन्ट्री?
- India vs West Indies 2022, 2nd T20I: भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज; संभाव्य प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज घ्या जाणून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha