IND vs WI: आतंरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आवेश खानला पदार्पणाची संधी
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे.
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. आजचा टी-20 सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारतानं आजचा सामना जिंकल्यास मालिकेवर कब्जा करणार आहे. तर, आजचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचा वेस्ट इंडीजचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, भारताचे अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि दीपक चहर पहिल्या टी-20 सामन्यात जखमी झाले आहेत. त्यांची दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज आवेश खानला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 16 फ्रेब्रुवारी खेळण्यात आलेल्या टी- 20 सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि दीपक चहर यांना दुखापत झाली. दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताची बाजू मजबूत करण्यासाठी आवेश खान आणि श्रेयस अय्यरला संघात सामील केलं जाण्याची शक्यता आहे. पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, "श्रेयस अय्यरसारख्या प्रतिभावान खेळाडूला बाहेर ठेवणे योग्य नाही. पण आम्हाला मधल्या फळीतला फलंदाज हवा आहे, जो गोलंदाजीही करू शकतो".
भारताचा संभाव्य प्लेईंग संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर/दीपक हूडा, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, भुवनेशवर कुमार आणि आवेश खान.
वेस्ट इंडीजचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन संघ:
वेस्टइंडीज की संभावित प्लेइंग इलेवन- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमॅन पॉवेल, कीरोन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोशटन चेज, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, शेल्डन कॉटरेल/डोमिनिक ड्रेक्स.
हे देखील वाचा-
- IND vs WI 2nd T20: दुसऱ्या टी-20 पूर्वी वेस्ट इंडीजची धाक-धूक वाढली; 'या' आक्रमक खेळाडूची संघात ऍन्ट्री?
- India vs West Indies 2022, 2nd T20I: भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज; संभाव्य प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज घ्या जाणून
- NZ W Vs IND W: भारतीय महिला संघानं एकदिवसीय मालिका गमावली, न्यूझीलंडविरुद्ध सलग तिसरा पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha