India vs West Indies 2022, 2nd T20I: भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज; संभाव्य प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज घ्या जाणून
India vs West Indies 2022, 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तीन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे.
India vs West Indies 2022, 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तीन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 आघाडी घेतलीय. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टी-20 मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर, दुसऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवून 3 सामन्याच्या टी-20 मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघातील प्लेईंग ईलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज कसा असू शकतो? यावर एक नजर टाकुयात.
कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असते. या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना संध्याकाळी होणार आहे. यामुळं मैदानावर धुके असण्याची शक्यता आहे. यामुळं नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. शुक्रवारी येथे हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पावसाची शक्यता नसल्यानं सामना पूर्ण खेळला जाईल. येथील तापमान कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. तर, 13 किलोमीटर प्रतितास हवा वाहण्याची शक्यात आहे.
भारताचा संभाव्य प्लेईंग संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर/दीपक हूडा, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, भुवनेशवर कुमार आणि आवेश खान.
वेस्ट इंडीजचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन संघ:
वेस्टइंडीज की संभावित प्लेइंग इलेवन- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमॅन पॉवेल, कीरोन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोशटन चेज, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, शेल्डन कॉटरेल/डोमिनिक ड्रेक्स.
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात वेस्ट इंडिज संघापेक्षा टीम इंडियाचे पारडे जड आहे. अशा परिस्थितीत या सामन्यातही रोहित ब्रिगेडच जिंकेल, असं आमचे मॅच प्रेडिक्शन मीटर सांगत आहे.
हे देखील वाचा-
- टेनिस स्टार Novak Djokovic च्या लस न घेण्याच्या निर्णयावर Adar Poonawalla म्हणाले....
- Ranji trophy 2022: अजिंक्य रहाणेचं टीकाकऱ्यांना प्रत्युत्तर, रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी झळकावलं शतक
- Surjit Sengupta Passes Away: प्रसिद्ध फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्ता यांचं कोरोनामुळं निधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha