एक्स्प्लोर

IND vs SL : यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं, गेलेली मॅच खेचून आणली, सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला लोळवलं

Team India : भारतानं सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला पराभूत करत मालिका 3-0 अशी जिंकली. सूर्य कुमारच्या सुपर कॅप्टनसीनं भारताला विजय मिळूवन दिला.

पल्लेकेले:  भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरी मॅच पार पडली. भारतानं सुपर ओव्हरमध्ये मॅच खेचून नेत विजय मिळवला. या सामन्यात  भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 137 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 20 ओव्हरमध्ये 8 बाद 137 धावा केल्या. यामुळं मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली. श्रीलंकेला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना त्यांनी 4 विकेट गमावत 8  धावा केल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली. भारताकडून अखेरच्या दोन ओव्हर रिंकू सिंग (Rinku Singh) आणि सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) टाकल्या. या दोन्ही ओव्हरमध्ये दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये पोहोचली.

सुपर ओव्हरचा थरार 

सुपर ओव्हरमध्ये  श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि  कुशल परेरा फलंदाजीसाठी आले होते. भारताकडून गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदरवर जबाबदारी  सोपवण्यात आली. सुंदरनं पहिला बॉल वाईड टाकला. कुशल मेंडिसनं पुढच्या बॉलवर एक रन दिली. यानंतर दुसऱ्या बॉलवर कुशल परेरा 1 रन करुन बाद झाला.  परेराचा कॅच रवि बिश्नोईनं घेतला.  यानंतर निसांका फलंदाजीसाठी आला त्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.  वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर रिंकू सिंगनं कॅच घेतला. यामुळं श्रीलंका 2 धावांवर बाद झाली. वॉशिंग्टन सुंदरनं सूर्यकुमार यादवनं सोपवलेली जबाबदारी पार पाडली.

यानंतर  सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी तीन धावांची गरज होती. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी तीन धावांची गरज असताना कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि उपकॅप्टन शुभमन गिल फलंदाजीसाठी हे दोघे फलंदाजीसाठी आले. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच बॉलवर चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.  

सूर्यकुमार यादवचे तीन निर्णय गेमचेंजर ठरले

खलील अहमदनं 18 व्या ओव्हरमध्ये 12  धावा दिल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं यावेळी रिंकू सिंगला गोलंदाजी दिली. त्यानं कुशल परेराला 46 धावांवर बाद केलं. यानंतर श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 6  धावांची गरज होती. त्यावेळी सर्वांना वाटत होतं मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करावी असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं 5  धावा देत दोन विकेट घेतल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली. यानंतर सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदरला दिली. त्यानं केवळ दोन विकेट घेतल्या आणि भारताचा विजय सोपा झाला. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीला आले. यानंतर सूर्यानं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. 

दरम्यान, शुभमन गिल(Shubman Gill), रियान पराग (Riyan Parag) आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 137 धावा केल्या. या विजयासह भारतानं मालिका 3-0 अशी जिंकली. 

संबंधित बातम्या :

रिंकू सिंग- सूर्यकुमार यादवनं गेलेली मॅच खेचून आणली, अखेर मॅच ड्रा, सुपर ओव्हरचा थरार रंगणार

Suryakumar Yadav :टी 20 मालिका संपताच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवसह आणखी चार खेळाडू भारतात परतणार, कारण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve : दानवेंची हटके स्टाईल, फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारुन बाजूला केलंEknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?Majha Kutumb Majha Prachar : उमेदावारांच्या खांद्याला खांदा लावत कुटुंबियांचा प्रचारMaharashra Assembly Poll : पोलचे आकडे, चर्चा जिकडे तिकडे, सर्व्हेमध्ये कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
चिंचवड मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शिवसेना ठाकरेंचा नेता करतोय भाजपचा प्रचार,सांगितलं राज'कारण'
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Embed widget