IND vs SA 3rd T20 LIVE: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे हायलायट्स
India vs South Africa 3rd T20 LIVE Score: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे.
LIVE
Background
India vs South Africa 3rd T20 LIVE Score: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलीय. त्यामुळे आज भारताला दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिका किमान शेवटचा सामना जिंकण्यासाठी नक्कीच शर्थीचे प्रयत्न करेल.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारतीय महिला आणि मलेशिया महिला यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 13 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं विजय मिळवलाय. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. संपूर्ण आकडेवारी पाहता टी-20 क्रिकेटमध्ये भारताचं पारडं जड दिसत आहे. मात्र, असं असनूही भारताला पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकता आलीय.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी अंपायर आणि मॅच रेफरींची घोषणा; यादीत एकमेव भारतीय