एक्स्प्लोर

Womens Asia Cup T20 2022: जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्माची वादळी खेळी; भारताचा यूएईवर 104 धावांनी विजय

Womens Asia Cup T20 2022: महिला आशिया चषकातील आठव्या सामन्यात भारतीय महिला संघानं यूएईचा (India Women vs United Arab Emirates Women) 104 धावांनी विजय मिळवलाय.

Womens Asia Cup T20 2022: महिला आशिया चषकातील आठव्या सामन्यात भारतीय महिला संघानं यूएईचा (India Women vs United Arab Emirates Women) 104 धावांनी विजय मिळवलाय. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) , दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर भारतानं यूएईसमोर 20 षटकांत 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईच्या संघाची दमछाक झाली. यूएईच्या संघाला 20 षटकात चार विकेट्स गामावून फक्त 74 धावांपर्यंत मजल मारता आली. 

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर सुभेनेनी मेघना आणि ऋचा घोष यांना काही खास कामगिरी करता आली नाही. सुभेनेनी मेघना 10 धावा तर, ऋचा  घोष 1 धाव करून बाद झाली. दयालन हेमलताही 2 धावा करून स्वस्तात माघारी परतली. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या दिप्ती शर्मा (49 चेंडूत 64 धावा) आणि जेमिमाह रॉड्रिग्सनं (45 चेंडूत 75 धावा) भारताचा डाव सावरला. जेमिमाह रॉड्रिग्स आणि दिप्ती शर्मा यांच्या व्यतिरिक्त भारतीय महिला संघातील कोणत्याही फलंदाजाला 15 धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारतानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून यूएईसमोर 20 षटकात 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. यूएईकडून  छाया मुघल, महिका गौर, ईशा रोहित ओझा आणि सुरक्षा कोट्टे यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

भारतानं दिलेल्या 179 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूएईच्या संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर तिर्था सतीश आणि इशा रोहित ओझा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कविशानं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिनं या सामन्यात 54 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली. कविशानंतर फक्त खुशी शर्मानंच 29 धावांची खेळी केली. या सामन्यात यूएईच्या संघ विकेट्स वाचवले. परंतु, संथ खेळीमुळं निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात यूएईला 104 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडला सर्वाधिक दोन विकेट्स मिळाल्या. तर, दयान हेमलताच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJob Majha : रेल्वे सुरक्षा दलात RPF सब इंस्पेक्टर पदासाठी 452 जागांवर भरती : जॉब माझा ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना

Embed widget