एक्स्प्लोर

IND vs SA:  IND vs SA: ऋषभ पंतच्या नेतृत्वात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची कामगिरी कशी होती?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र काल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना पावसामुळं रद्द करावा लागला, जो निर्णायक होता.

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना पावसामुळं रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत संघाची धुरा संभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं कशी कामगिरी केली? यावर एक नजर टाकुयात.

पहिला टी-20 सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

दुसरा टी-20 सामना
दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात  दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 18.2 षटकात भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात हेन्रिक क्लासेननं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताल पराभूत करून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली. 

तिसरा टी-20 सामना
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिकेत 2-0 नं आघाडी घेतली. त्यानंतर विशाखापट्टम येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं. 

चौथा टी-20 सामना
भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात 17 जूनला चौथा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं भारतीय संघासाठी 55 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

पावसाच्या व्यत्ययामुळं निर्णायक सामना रद्द
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगतदार स्थितीमध्ये आली होती. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना रद्द करण्यात आला. शेवटचा सामना रद्द झाल्यामुळं ही मालिका बरोबरीत सुटली . या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला विक्रम रचण्याची संधी होती. भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिकेच्या संघान एकही टी-20 मालिका गमावली नाही.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025ABP Majha Headlines : 02 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Embed widget