एक्स्प्लोर

IND vs SA T20 2022: बंगळुरुमध्ये पावसाचा विजय, मालिका बरोबरीत

IND vs SA T20 2022: पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे.

IND vs SA T20 2022: पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे. बंगळुरु येथे सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सामन्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावासाचे वातावरण पाहाता भारतीय संघाने विस्फोटक सुरुवात केली. 2.3 षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस आला. त्यानंतर खेळ पुन्हा थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबला तर 5-5 षटकांता सामना होईल, असे पंचांकडून जाहीर करण्यात आले. मात्र, पावसाने विश्रांती घेतलीच नाही. त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका बरोबरीत सुटली.  मालिकेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भुवनेश्वर कुमार याने चार सामन्यात सहा विकेट घेतल्या. यावेळी धावसंख्याही रोखण्याचं काम भुवनेश्वर कुमारनं केले. 

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 
2015 - दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने विजय 
2019 - मालिका 1-1 ने बरोबरीत
2022 - मालिका 2-2 ने बरोबरीत

2022 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत काय झाले? - 
2022 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकाविरोधात एकाही मालिकेत विजय नोंदवता आला नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 दक्षिण आफ्रिका वरचढ राहिलाय. दक्षिण आफ्रिकाने मायदेशात कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही 3-0 ने मात केली. तर भारतात झालेली मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली. 

निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमीत कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून त्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रिजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिले. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आला होता. 

कमनशिबी ऋषभ पंत, लागोपाठ 5 वेळा नाणेफेक गमावली 
मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतानं पुढील दोन सामन्यात विजय मिळून जोरदार कमबॅक केलंय. निर्णायक सामन्यात ऋषभ पंत याने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. ऋषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली. पंतच्या नाणेफेकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. टेम्बा बावुमासमोर पहिल्या चार सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक गमावली होती. आज निर्णायक सामन्यातही पंतला नाणेफेक जिंकता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकली. यासह या मालिकेत पंतला एकदाही नाणेफेक जिंकता आली नाही. सलग पाच वेळा पंतने नाणेफेक गमावली. यासह त्याने विराट कोहलीचा नकोसा विक्रम मोडीत काढलाय. विराट कोहलीने टी 20 मध्ये सलग चार वेळा नाणेफेक गमावली होती.  

भारताची प्लेईंग 11 - 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 - 
क्विंटन डिकॉक (विकेटकिपर),  रिजा हेंड्रिक्स, डेवान प्रिटोरियस, रासी वान डुसेन, एच. कालसेन, डेविड मिलर, ट्रस्टिन स्टब्स, कगिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), एनरिक नॉर्त्जे, लुंगी एनगिडी 

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget