एक्स्प्लोर

IND W vs PAK W: क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने, श्रीलंकेत महिला आशिया कपचा रणसंग्राम सुरु होणार 

Women's Asia Cup 2024: महिला आशिया कप आजपासून सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मॅच होणार आहे.यूएई विरुद्ध नेपाळ लढतीनं स्पर्धेची सुरुवात होईल. 

कोलंबो : श्रीलंकेत महिला आशिया कप स्पर्धा (Womens Asia Cup)आजपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. आज दुपारी संयुक्त अरब अमिरात विरुद्ध नेपाळ लढतीनं स्पर्धेची सुरुवात होईल. यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND W vs PAK W) यांच्यात मॅच होणार आहे. यामुळं भारतीय चाहत्यांसाठी आजची मॅच पर्वणी ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय पुरुष संघानं पाकिस्तानचा पराभव केला होता.आज  भारतीय महिला क्रिकेट संघ ( India women's cricket team) पाकिस्तानला पराभूत करणार का ते पाहावं लागेल. 

भारतीय महिला संघानं यापूर्वीच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं असून यावेळी स्पर्धा जिंकण्याच्या इराद्यानं टीम मैदानात उतरले. भारतानं महिला आशिया कप स्पर्धेत सातवेळा विजेतेपद मिळवलं आहे. श्रीलंकेत आजपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

भारत पाकिस्तान आज लढत

महिला आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान आज लढत होणार आहे. आज सायंकाळी ही मॅच होणार आहे. भारताच्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तान विरुद्धच्या मॅचनं होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया हे संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, पाकिस्तान आणि भारताचा समावेश आहे. ब गटात मलेशिया, थायलंड, बागंलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. 

भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात या स्पर्धेत खेळणार आहे. उपकर्णधार स्मृती मानधना ही देखील या मालिकेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकते.  

महिला आशिया कपमधील भारताची पहिली मॅच पारंपरिक विरोधक असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत करुन विजयानं मोहीम सुरु करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.    

भारत आणि पाकिस्तानचा संघ

भारतीय संघ:हरमनप्रीत कौर(कॅप्टन), स्मृती मानधना (उपकॅप्टन), शफाली वर्मा, जेमिया रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), उमा खेत्री (विकेटकीपर),पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभमना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन 

राखीव: श्वेता शेरावत,साईका इशाक, तनुजा कन्वर, मेघना सिंग 

पाकिस्तानचा संघ : मुनीबा अली(विकेटकीपर), नजिया अल्वी (विकेटकीपर), अलिया रियाझ, इराम जावेद, सीद्रा अमीन, फिरोझा गुल, निदा दार(कॅप्टन), ओमैमा सोहेल, सना फतिमा, सईदा अरुब शाह,तुबा हसन, तस्मिया रुबाब, नाशरा संधू, सादिया इक्बाल, डायना बैग

दोन्ही गटातील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीच्या लढती 26 जुलै रोजी पार पडतील. तर अंतिम फेरीची लढत 28 जुलै रोजी होणार आहे. 

महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण कुठं होणार? 

महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण भारतात डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाईल. तर, टीव्हीवरील प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवर केलं जाणार आहे. 

महिला आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक Women's Asia Cup 2024: Complete Schedule

19 जुलै : 
संयुक्त अरब अमिरात विरुद्ध नेपाळ, दुपारी 2 वाजता
भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी 7 वाजता 

20 जुलै

मलेशिया विरुद्ध थायलंड, दुपारी 2 वाजता
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश , सायंकाळी 7 वाजता  

21 जुलै 

भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिरात ,दुपारी 2 वाजता

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ ,सायंकाळी 7 वाजता  

22 जुलै 

श्रीलंका विरुद्ध मलेशिया,दुपारी 2 वाजता 

बांग्लादेश विरुद्ध थायलंड, सायंकाळी 7 वाजता  
 
23 जुलै 

पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरात, दुपारी 2 वाजता  

भारत विरुद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता  

 24 जुलै 

बांग्लादेश विरुद्ध मलेशिया, दुपारी दोन वाजता 

श्रीलंका विरुद्ध थायलंड ,सायंकाळी 7 वाजता  

26 जुलै

उपांत्य फेरीचा पहिला सामना: दुपारी 2 वाजता 

उपांत्य फेरीचा दुसरा सामना : सायंकाळी 7 वाजता  

28 जुलै

अंतिम फेरीचा सामना, सायंकाळी 7 वाजता  

संबंधित बातम्या : 

रोहित शर्मानंतर विराट कोहली देखील श्रीलंका दौऱ्यात खेळणार, गौतम गंभीरचा सन्मान राखणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget