एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीनं श्रीलंका दौऱ्यासाठी घेतला मोठा निर्णय, गौतम गंभीरचा मान राखणार, बीसीसीआयला कळवला होकार

Virat Kohli : भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली देखील श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल. विराटनं बीसीसीआयला तसं कळवलं आहे.

नवी दिल्ली : भारताचा (Team India) श्रीलंका दौरा पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कारकीर्द देखील याच मालिकेपासून सुरु होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्डकपनंतर संपला. बीसीसीआयनं गौतम गंभीर याच्यावर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू खेळणार नाहीत अशा चर्चा आहेत. तर, हार्दिक पांड्यानं वनडे मालिकेतून माघार घेतलेली आहे.  रोहित  शर्मानं बीसीसीआयला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कळवल्यानंतर विराट कोहलीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहली देखील श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयला विराट कोहलीनं याबाबत कळवलं असल्याची माहिती आहे. 

विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा देखील खेळणार असल्याची माहिती आहे. गौतम गंभीरनं रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी श्रीलंका दौऱ्यात खेळलं पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे.  याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

रोहित शर्मा, विराट कोहलीची टी 20 मधून निवृत्ती 

भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिकंल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मानं देखील निवृत्ती जाहीर केल्यानं भारताचा टी 20 चा नवा कर्णधार निवडण्याचं आव्हान बीसीसीआय पुढं आहे. बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्यात विविध नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. टी 20 चा कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं नाव चर्चेत आहे. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 मधून निवृत्ती घेतल्यानं दोघे आता केवळ एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीपुढं आगामी काळातील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद भारताला मिळवून देण्याचं आव्हान असेल. श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाल्यास दोघे कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या :

Rohit Sharma : रोहित शर्मानं बॉलिंगचा सराव केला अन् फलंदाज बनला, प्रशिक्षक दिनेश लाड यांनी गुपित सांगितलं

Team India: हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार? आकडेवारी नेमकी कुणाच्या बाजूनं?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget