Tim Southee Record: टीम साऊथीनं कपिल देवचा खास विक्रम मोडला!
IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय.
IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीनं (Tim Southee) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. टीम साऊथीनं दीपक हुडाला माघारी धाडत भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा (Kapil Dev) विक्रम मोडलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम साऊथी तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जवागल श्रीनाथ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक 51 विकेट्स घेतल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे या यादीत 39 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टीम साऊथीचा क्रमांक लागतो. टीम साऊथीनं भारताविरुद्धच्या 24 एकदिवसीय सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. तर, कपिल देवच्या नावावर 33 विकेट्सची नोंद आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम साऊथीनं न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्यानं या बाबतीत माजी गोलंदाज टायमल मिल्सला मागं टाकलं.
भारत- न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील सर्वाधिक विकेट्स:
क्रमांक | गोलंदाज | विकेट्स |
1 | जवागल श्रीनाथ | 51 |
2 | अनिल कुंबळे | 39 |
3 | टीम साऊथी | 34 |
4 | कपिल देव | 33 |
भारताचं न्यूझीलंडसमोर 220 धावांचं लक्ष्य
वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर 220 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णाधार केन विल्यमसननं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला अॅडम मिल्ने आणि डॅरिल मिशेल त्यानंतर टीम साऊथीनं भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा डाव अवघ्या 219 धावांवर आटोपला.
हे देखील वाचा-