IND vs NZ :तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा अन् वॉशिंग्टन सुंदरचा धमाका, न्यूझीलंडचा डाव 235 धावांमध्ये संपवला
IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं धमाका करत न्यूझीलंडच्या डावाला सुरुंग लावला.
IND vs NZ 3rd Test 1st New Zealand Innings Highlight मुंबई : मुंबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतच्या फिरकीपटूंसमोर त्यांचा निभाव लागला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईत खेळवली जात आहे. रवींद्र जडेजानं 5 विकेट घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरनं 4 विकेट घेतल्या.
न्यूझीलंडनं तिसऱ्या कसोटीत टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फिरकीपटूंनी 65.4 ओव्हेरमध्ये न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर रोखला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजानं 5 विकेट घेतल्या तर दुसऱ्या कसोटीप्रमाणं तिसऱ्या कसोटीत देखील वॉशिंग्टन सुंदरनं कमाल केली.
न्यूझीलंडला पहिला धक्का 15 धावा झालेल्या असताना बसला. डेवोन कॉन्वे हा 4 धावा करुन बाद झाला.तर, दुसरी विकेट न्यूझीलंडच्या 59 धावा झालेल्या असताना गेली. कॅप्टन टॉम लाथम 28 धावा करुन बाद झाला. न्यूझीलंडची तिसरी विकेट 72 धावा झाल्या असताना गेली. त्यानंतर पाहुण्या संघाचा डाव सावरला होता. टीमच्या 159 धावा झाल्या असताना त्यांनी दोन विकेट गमावल्या.
न्यूझीलंडची सहावी विकेट 187 धावा असताना गेली. तर, 210 धावा झालेल्या असताना सातवी आणि आठवी विकेट गेली. नववी विकेट 228 धावांवर तर दहावी विकेट 235 धावा असताना गेली.
न्यूझीलंडनं सर्वात मोठी भागिदारी तिसऱ्या विकेटसाठी केली. डेरिल मिशेल आणि विल यंग या दोघांनी 87 धावांची भागिदारी केली होती. रवींद्र जडेजानं 65 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर, वॉशिंग्टन सुंदरनं 81 धावा देत 4 विकेट घेतल्या. आकाशदीपनं 1 विकेट घेतली.
भारताला तिसरी कसोटी जिंकून कमबॅक करणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने भारतानं गमावले आहेत. न्यूझीलंडनं सलग दोन कसोटी सामने जिंकत मालिका जिंकली. भारतानं तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. आता तिसरी कसोटी जिंकून कमबॅक करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवण्यासाठी भारताला तिसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
दरम्यान, भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी केली होती. मात्र, चांगली सुरुवात केल्यानंतर रोहित शर्माला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
इतर बातम्या :