(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs NZ: सेम टू सेम! पहिले टॉम लॅथम, मग रचिन रवींद्र...; दोघांची वॉशिंग्टनकडून 'सुंदर' दांडी गुल, Video
India vs New Zealand: भारताकडून आकाश दीपने 1 विकेट तर, वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स पटकावल्या.
Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. सध्या न्यूझीलंडने 50 षटकांत 5 विकेट्स गमावत 175 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने 28, डेव्होन कॉनवेने 4, विल यंग 71, रचिन रवींद्रने 5 धावा केल्या. तर टॉम टॉम ब्लंडेलला एकही धाव करता आली नाही. डॅरेल मिचेल 45 धावांवर खेळत आहे.
भारताकडून आकाश दीपने 1 विकेट तर, वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स, तर रवींद्र जडेजाने 2 विकेट्स पटकावल्या आहेत. विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि रचिन रवींद्र याला त्रिफळाचीत बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने लॅथम आणि रचिनला सेम टू सेम चेंडू टाकत बाद केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WASHINGTON SUNDAR WITH TWO ABSOLUTE JAFFAS..!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2024
- First Latham, now Rachin. 🤯👌pic.twitter.com/JBz5P04YwP
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल/सरफराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन:
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हॅन्री, एजाज पटेल, विल्यम ओरुके.
WTC च्या गुणतालिकेची काय स्थिती?
आता पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर होणारा तिसरा आणि अंतिम कसोटी सामना भारताला कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत अजूनही सहा कसोटी सामने खेळायचे आहेत आणि अंतिम फेरीत पोहचण्यासाठी किमान चार सामने जिंकावे लागतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारत पुणे कसोटीपूर्वी 68.06 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 61.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय 55.56 टक्के गुणांसह श्रीलंका तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका 47.62 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड 44.44 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताची गुणांची टक्केवारी 62.82 वर आली आहे.