Virat Kohli : भर पावसात विराट आला मैदानात, स्टेडिअममध्ये 'किंग कोहली'च्या नावाचा जयघोष; Viral Video
विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. कोहली नुकताच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला.
Ind vs Nz 1st Test Virat Kohli Viral Video : विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. कोहली नुकताच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला. आता कोहली भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत दिसणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता खेळवला जाणार होता, परंतु पावसामुळे सामन्याचे पहिले सत्र सुरू न होताच संपले.
बेंगळुरूमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली मैदानातून बाहेर पडताना दिसत आहे.
कोहली बाहेर येताना पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला आणि हळूहळू संपूर्ण स्टेडियम गुंजू लागले. व्हिडिओमध्ये विराट कोहली छत्रीखाली छोटी बॅग लटकवत स्टेडियममधून बाहेर जात असल्याचे दिसत आहे. कोहलीसोबत यशस्वी जैस्वालही दिसत आहे. जैस्वाल किट बॅग सोबत दिसत आहेत.
VIirat Kohli And @ybj_19 At Chinnaswamy Stadium, Bengaluru 💙#ViratKohli #YashasviJaiswal #INDvNZ pic.twitter.com/ebGe4wf4Yh
— virat_kohli_18_club (@KohliSensation) October 16, 2024
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यानंतर मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 01 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड - टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.
हे ही वाचा -
Ind vs Nz Rain Update : बंगळुरूमध्ये यलो अलर्ट, रोहित शर्मा टेन्शनमध्ये; WTC फायनलचं गणित फिस्कटणार?