Ind vs Nz Rain Update : बंगळुरूमध्ये यलो अलर्ट, रोहित शर्मा टेन्शनमध्ये; WTC फायनलचं गणित फिस्कटणार?
India Vs New Zealand 1st Test bengaluru Rain Weather Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे.
Team India WTC Final Scenario : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. जी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलचा भाग आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, मात्र हा सामना पावसाच्या छायेत असून पहिल्याच दिवशी पावसामुळे नाणेफेक झाली नसल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर यानंतर उर्वरित चार दिवसही पाऊस पडणार असल्याची चर्चा असल्याने भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.
भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला पराभूत करण्याचा आणि पीसीटी आणखी पुढे नेण्याचा भारताचा प्रयत्न असेल, जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही सामने गमावले तरी त्याचा अंतिम सामना खेळण्यावर फारसा परिणाम होणार नाही. पण रोहित शर्मा आणि भारताच्या या पाऊस आशा धुळीला मिळू शकतात.
भारतीय संघाच्या पीसीटीवर होणार परिणाम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलवर नजर टाकली तर, भारतीय संघ सध्या 74.240 वर आहे. पण बंगळुरूचा सामना पावसामुळे रद्द झाला तर? अशा स्थितीत सामना अनिर्णित राहील आणि टीम इंडियाचा पीसीटी जो सध्या 74.240 आहे तो 70.83 इतका कमी होईल. म्हणजे भारताचे मोठे नुकसान होईल. जर आपण न्यूझीलंडबद्दल बोललो, तर हा संघ सध्या 37.500 च्या पीसीटी सह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. जर बेंगळुरू टेस्ट रद्द झाली तर त्याचे पीसीटी 37.04 पर्यंत कमी होईल. म्हणजे पीसीटीनुसार न्यूझीलंडला फारसे नुकसान होणार नाही.
दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी बेंगळुरूच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी येथे 70 ते 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातही पाऊस आहे. येथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच पाऊस कमी असो वा जास्त असो, सामन्यादरम्यान व्यत्यय येणारच. भारतीय चाहत्यांना आशा असेल की हा सामना होईल आणि टीम इंडिया जिंकण्यात यशस्वी होईल, जेणेकरून ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या जवळ आणखी एक पाऊल टाकू शकेल.
WTC फायनल कधी होणार?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या तिसऱ्या सत्राचा अंतिम सामना पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये 11 ते 15 जून या कालावधीत लॉर्ड्स येथे खेळवला जाईल. आयसीसीने या सामन्यासाठी 16 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. लॉर्ड्स प्रथमच WTC फायनलचे आयोजन करणार आहे. कोणते दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.