Ind vs NZ 1st Test : गंभीरची रणनीती फसली! रोहित 2, विराट-0, सरफराज-0, पहिल्या 10 षटकात टीम इंडियाची बत्ती गुल?
न्यूझीलंडसोबत खेळल्या जाणाऱ्या बेंगळुरू कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली.
India vs New Zealand 1st Test day-2 : न्यूझीलंडसोबत खेळल्या जाणाऱ्या बेंगळुरू कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या 10 षटकांत संघाने 3 महत्त्वाचे विकेट गमावले आहेत. आधी रोहित शर्मा नंतर विराट कोहली आणि त्यानंतर सरफराज खानने आपली विकेट गमावली. रोहित 2 धावांवर बाद झाला, विराट कोहली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर सरफराज खान शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. डेव्हन कॉनवेने सरफराजचा अप्रतिम झेल घेतला.
बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या अडचणी वाढत आहेत. डावाच्या सातव्या षटकात टीम साऊदीने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर सर्वांच्या नजरा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीकडे लागल्या होत्या. पण, किवी वेगवान गोलंदाज विल्यम ओरूर्कने त्याला शून्यावर बाद केले. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला, मात्र त्याला एकही धाव करता आली नाही.
विराट कोहलीला 2020 पासून आतापर्यंत कसोटीत केवळ दोनच शतके करता आली आहेत. शुभमन गिल या सामन्यात खेळत नाही. विराट आऊट झाल्यानंतर बॅटींगला आलेल्या सरफराज खानने मॅट हेन्रीच्या चेंडूवर कॉनवेकरवी झेलबाद केले. विराटनंतर सरफराजलाही खाते उघडता आले नाही. भारताची टॉप ऑर्डर ढासळली आहे.
पावसामुळे खेळ थांबला
पावसामुळे खेळ थांबला आहे. आज सामना नियमित वेळेच्या 15 मिनिटे आधी सुरू झाला. मात्र, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहितचा निर्णय चुकीचा ठरला आहे. ढगाळ वातावरणात टीम इंडियाने 12.4 षटकात 13 धावांत तीन विकेट गमावल्या आहेत. सध्या ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. शुभमन गिल अनफिट असून आकाश दीपला विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांच्या जागी सरफराज खान आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली.
भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन -
भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड : टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ'रुर्के.