Richard Gleeson : 34 व्या वर्षी पदार्पण, पहिल्याच सामन्यात विराट, रोहितसह पंतला धाडलं तंबूत, कोण आहे रिचर्ड ग्लीसन?
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने सलामीच्या सामन्यातच तीन महत्त्वाचे विकेट घेतले असून त्याने वयाच्या 34 व्या वर्षी पदार्पण करत ही कामगिरी केली आहे.
India tour of England : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात 49 धावांनी भारताने विजय मिळवला. पण सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने (Richard Gleeson) अप्रतिम कामगिरी केली. रिचर्डने जवळपास 35 वर्षांच्या वयात संघात पदार्पण करत भारताच्या प्रमुख फलंदाजांना तंबूत धाडलं.
भारताच्या टॉप ऑर्डरला धाडलं तंबूत
रिचर्ड ग्लीसनने सामन्यात अफलातून कामगिरी करत भारताच्या टॉप ऑर्डरला तंबूत धाडलं. आधी रोहित शर्मा मग विराट कोहली आणि अखेर ऋषभ पंतला रिचर्डने बाद केलं. यावेळी रोहितने 30 चेंडूत 31, विराट कोहलीने 3 चेंडूत 1 आणि पंतने 15 चेंडूत 26 रन केले. या तिघांनाही सलामीच्या सामन्यात रिचर्डने बाद कर पदार्पणाच्या सामन्यात उत्तम कामगिरी करण्याची कमाल केली आहे. ग्लीसन इंग्लंडकडून डेब्यू करणाऱ्या वयस्कर खेळाडूंमधील एक असून त्याने 34 वर्षे 219 दिवसाचा असताना डेब्यू केला आहे. तर या एकंदरीत यादीवरही एक नजर फिरवूया...
पॉल निक्सन: 36 वर्षे 80 दिवस
डॅरेन गफ: 34 वर्षे 268 दिवस
रिचर्ड ग्लीसन: 34 वर्षे 219 दिवस
जेरेमी स्नेप: 34 वर्षे 142 दिवस
स्थानिक क्रिकेटमधील रिचर्डचं प्रदर्शन
रिचर्ड ग्लीसनने (Richard Gleeson) स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटसह लिस्ट ए आणि टी20 सामने खेळले आहेत. 34 प्रथम श्रेणी सामन्यात रिचर्डने 143 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 21 सामन्याक 28 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये रिचर्डने 64 डावात 73 विकेट्स घेतले आहेत. टी20 मध्ये 33 धावा देत 5 विकेट्स घेणं त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं आहे.
हे देखील वाचा-
- Bakri Eid 2022 : भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली बकरी ईद, सिराज, आवेशसह उमरानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- Watch : हॉकी विश्वचषक सामन्यादरम्यान महिला खेळाडूची बॉयफ्रेंडला किस, भर मैदानात केलं प्रपोज, पाहा VIDEO
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक