क्रिकेटच्या इतिहासात कधी नव्हतं ते आता घडतंय; चक्क कॅमेरा लावून फिल्डिंग करणार खेळाडू!
IND vs ENG: क्रिकेट सामन्यातील रोमांचक वाढण्यासाटी मैदानात ठिकठिकाणी कॅमेरे लावले जातात.
IND vs ENG: क्रिकेट सामन्यातील रोमांचक वाढण्यासाटी मैदानात ठिकठिकाणी कॅमेरे लावले जातात. स्टंप आणि अंपायरच्या डोक्यासह मैदानात बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात कधी नव्हतं ते आता घडणार आहे. स्काय स्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या खेळाडूच्या हेल्मेटवर कॅमेरा बसवला जाणार आहे.
आयसीसी आणि ईसीबीकडून मंजूरी
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक जुलैपासून रिशेड्युल केलेला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, स्काय स्पोर्ट्स आपल्या क्रिकेट कव्हरेजमध्ये एक नावीन्य आणत आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा संघ सहकारी ओली पोप शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हेल्मेटवर कॅमेरा घालताना दिसेल. आयसीसी आणि ईसीबीनं याला मंजूरी दिलीय. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष दृश्य मिळेल.
कॅमऱ्यात साऊंड रेकॉर्डर नसणार
"या कॅमेऱ्याद्वारे मिळणाऱ्या दृश्यातून प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मिळेल. महत्वाचं म्हणजे, खेळादरम्यान खेळाडू एकमेकांशी काय संवाद साधतात, हे गुपित ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यामध्ये साऊंड रेकार्डर नसणार. यामुळं खेळाडूंना कशाचीही चिंता करण्याची गरज भासणार नाही", अशीही माहिती स्काय स्पोर्ट्सनं दिलीय.
या कॅमेऱ्याचा प्रयोग पहिल्यांदा कधी झाला?
स्काय स्पोर्ट्सनं गेल्या वर्षी हा प्रयोग करून पाहिला होता. त्यावेळी ट्रेन्ट रॉकेट्सच्या टॉम मूरेसनं विकेटकिपिंग करताना हा कॅमेरा घातला होता. ज्यामुळं या सामन्यातील विविध दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. पॉप हा उत्कृष्ट फिल्डर आहे. त्यानं गेल्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात शॉर्ट लेगमध्ये उत्कृष्ट झेल घेतला होता.
हे देखील वाचा-