Rohit-Shikhar : शर्मा-धवन जोडीची कमाल, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांची भागिदारी पूर्ण
ENG vs IND : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे दिग्गज सलामीवीर रोहित आणि शिखर यांची जोडी बऱ्याच काळानंतर पुन्हा मैदानात परतली आणि परतताच त्यांनी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
ENG vs IND, 1st ODI : भारतीय संघाने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला 10 विकेट्सनी मात दिली. यावेळी उत्तम गोलंदाजी तर झालीच, पण भारताचे दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी बऱ्याच काळानंतर मैदानात येत एक शतकी भागिदारी रचत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सलामी शिखर धवन (Shikhar Dhawan) या दोघांनी मिळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. दोघांनी आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांत भागिदारीतून तब्बल 5 हजार हून अधिक धावा केल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंविरुद्ध भारत या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित आणि धवननं 111 डावात 4994 धावा केल्या होत्या. पण आता या सामन्यात तब्बल 114 धावा करत या दोघांच्या नावावर आता 5 हजार 108 धावा झाल्या आहेत. भारताकडून 5 हजारांहून अधिक धावा करणारे हे दोघांची ही दुसरीच जोडी असून याआधी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी ही कमाल केली आहे. या दोघांनी 136 डावांमध्ये 6 हजार 609 धावांची भागेदारी केली आहे.
शर्मा-धवन जोडी चौथ्या क्रमांकावर
क्रिकेटविश्वात शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.. या यादीत वेस्ट इंडिजची सलामी जोडी गॉर्डन ग्रीननीड्स आणि डेसमंड हेन्सचे अव्वल स्थानी आहे. त्यांनी 102 डावात 5 हजार 150 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानं 114 डावात 5 हजार 472 धावा केल्या आहेत.
भारताचा 10 गडी राखून विजय
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 विकेट्सनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सामन्यात भारतीय खेळाडूंनी आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी दाखवली. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. त्यानंतर 111 धावांचं लक्ष्य केवळ 18.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केलं.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 1st ODI : भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, 10 गडी राखून दिली मात, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय
- Mohammed Shami ODI Record : मोहम्मद शमीची कमाल, जलदगतीने 150 वन-डे विकेट पूर्ण करणाऱ्यां यादीत तिसऱ्या क्रमांकावर