Mohammed Shami ODI Record : मोहम्मद शमीची कमाल, जलदगतीने 150 वन-डे विकेट पूर्ण करणाऱ्यां यादीत तिसऱ्या क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलदगतीने 150 विकेट्स पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत शमी अफगाणिस्तानच्या राशिद खानसोबत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोघांनीही 80 सामन्यांत ही कमाल केली आहे.
IND vs ENG, 1st ODI Match : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झाली असून पहिल्याच सामन्यात भारताने अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आहे. इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज भारताने तंबूत धाडले आहेत. यावेळी मोहम्मद शमी याने एका दमदार रेकॉर्डला गवसणी देखील घातली आहे. शमीने सामन्यात तिसरा विकेट घेताच 150 एकदिवसीय विकेट्स पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे शमीने अगदी जलदगतीने हे विकेट्स पूर्ण करत जलदगतीने 150 एकदिवसीय विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानसोबत शमी तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. दोघांनीही 80 सामन्यांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्च अव्वल स्थानी असून त्याने ही कमाल 77 सामन्यात केली आहे. तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सक्लेन मुश्ताक याने ही कामगिरी 78 सामन्यात केली होती. भारताकडून सर्वात जलदगतीने ही कामगिरी करणारा मोहम्मद शमी हाच असून याआधी अजित आगरकरच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 97 सामन्यात ही कामगिरी केली होती.
सर्वात जलदगतीने 150 एकदिवसीय विकेट्स घेणारे गोलंदाज
गोलंदाज | सामने |
मिचेल स्टार्च | 77 |
सक्लेन मुश्ताक | 78 |
मोहम्मद शमी/राशिद खान | 80 |
ट्रेन्ट बोल्ट | 81 |
ब्रेट ली | 82 |
हे देखील वाचा-