IND vs BAN: बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण
IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय.
IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. दुसरीकडं बांगलादेशचा संघ दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल.
ट्वीट-
🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) December 7, 2022
Bangladesh have elected to bat against #TeamIndia in the second #BANvIND ODI.
Follow the match ▶️ https://t.co/e77TiXdfb2 pic.twitter.com/4yTmlzKbez
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश हा दुसरा एकदिवसीय सामना आज (7 डिसेंबर 2022) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक झालं. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्याचे लाईव्ह लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लीव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे सर्व अपडेट्स पाहता येतील.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश एकदिवसीय संघ:
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.
हे देखील वाचा-