Ind vs Ban 2nd T20 : बांगलादेशने भारताविरुद्ध जिंकली नाणेफेक; कर्णधार सूर्याने संघात केला नाही बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
India vs Bangladesh 2nd T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
India vs Bangladesh 2nd T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना 7 गडी राखून जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात भारताकडून मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांना पदार्पणाची संधी मिळाली. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने दुसऱ्या टी-20 नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने एक बदल केला आणि शरीफुल इस्लामच्या जागी तनझिम हसनला अकराव्या स्थानी स्थान दिले. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सांगितले की, भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 127 धावांत गुंडाळले होते. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी 29-29 धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या 39 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर सामना 11.5 षटकांत संपुष्टात आला. 7 गडी राखून मोठा विजय मिळवत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा एकतर्फी पराभव केल्याने बांगलादेशला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारताची प्लेइंग-11 : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेशची प्लेइंग-11 : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.