(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ritika Sajdeh on Rohit Sharma: दुखापतग्रस्त रोहित शर्माला फलंदाजी करताना पाहून पत्नी रितिका भावूक, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट
IND vs BAN 2nd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय.
IND vs BAN 2nd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह बांगलादेशच्या संघानं एकदिवसीय मालिकेवर कब्जा केलाय. भारतानं सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामगिरीचं सोशल मीडियावर कौतूक होत आहे. मात्र, हाताला दुखापत झाल्यानंतरही रोहित शर्मानं भारताला विजय मिळवून देण्यासाठी कडवी झुंज दिली. फिल्डिंगदरम्यान, रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला सलामीला फलंदाजीसाठी येता आलं नाही. पण या सामन्यात भारतीय संघ अडकल्याचं पाहून रोहितनं फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 9व्या क्रमांकावर उतरून 28 चेंडूत नाबाद 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान, रितिका सजदेहनं (Ritika Sajdeh) पती रोहित शर्मासाठी भावूक पोस्ट केली आहे.
भारतानं दुसरा एकदिवसीय सामना पाच धावांनी गमावला. पण रोहित शर्माच्या वादळी खेळीनं सर्वांचं मन जिंकली आहेत. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या खेळीवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. तर रितिकानं पती रोहित शर्मासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली खास स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.
IND vs BAN 2nd ODI: रितिकानं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काय लिहिलं?
रितिकानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अंगठ्याला दुखापत झालेल्या रोहित शर्माचा फलंदाजी करतानाचा फोटो शेअर केलाय. तसेच कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू ज्या प्रकारची व्यक्ती आहेस त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे. अशा परिस्थितीत तिथे जाऊन फलंदाजी करणं खरचं एक अद्भुत गोष्ट आहे."
IND vs BAN 2nd ODI: रोहितच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट
लाईव्ह सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. ज्यानंतर त्याला तातडीनं एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, रोहित शर्माच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय. सामन्यानंतर रोहितनं त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीवर भाष्य केलं. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल नसल्याचं त्यानं सांगितलं आहे.
IND vs BAN 2nd ODI: आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहितचे सर्वाधिक षटकार
रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 256 षटकार लगावले आहेत. तर, कसोटीत 64 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 182 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये शाहीद आफ्रिदी (351 षटकार) टॉपवर आहे. त्यानंतर ख्रिस गेल 331 षटकारासंह दुसऱ्या आणि सनथ जयसूर्या 270 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद आहे.
हे देखील वाचा-