IND vs BAN 1st Test Live : रोहित-विराट 6 तर गिल शून्यावर आऊट, चेन्नई कसोटीत पहिल्या 1 तासात 24 वर्षीय गोलंदाजाने टीम इंडियाला रडवलं...
India vs Bangladesh 1st Test Live : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.
IND vs BAN 1st Test Live Najmul Hossain : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु झाला आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कर्णधाराच्या जागी आलेल्या शुभमन गिल तर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर विराट कोहलीही जास्त वेळ विकेटवर खेळू शकला नाही. चेन्नई कसोटीत पहिल्या 1 तासात टीम इंडियाच्या तीन स्टार खेळाडूची शिकार 24 वर्षीय हसन महमूदने केली.
रोहित शर्मा 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये
चेन्नई कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, तो पहिल्या डावात स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. खरंतर, बांगलादेशच्या 24 वर्षीय हसन महमूद उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने भारतीय फलंदाजांवर दबाव कायम ठेवला, त्याचा परिणाम म्हणजे रोहितची विकेट मिळाली. हसन महमूदच्या गुड लेन्थ बॉलवर रोहितने हलक्या हातांनी शॉट खेळणाचा करण्याचा प्रयत्न केला, पण बॅटचा बाहेरचा कट लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये चेंडू गेला जेथे शांतोने दोन्ही हातांनी झेल घेतला आणि रोहितला 6 धावांवर परतावे लागले.
शुभमन गिल शून्यावर आऊट
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल फलंदाजीला आला. हसन महमूद 8व्या षटकात गोलंदाजी करायला आला. गिलने षटकातील तिसरा चेंडूही फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी हा शॉट त्याला महागात पडला. हसनने लेगस्टंपच्या बाहेर गुड लेंथवर चेंडू टाकला जो पडल्यानंतर बाहेर गेला. यावर गिलने शॉट खेळला पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टिरक्षक लिटन दासच्या हातात गेला. अशातच गिल शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
विराट कोहलीही 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये
चेन्नई कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रोहित शर्मा 6 धावांवर बाद झाला, शुभमन गिल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, तर तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली आहे, तो फक्त 6 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे भारताची धावसंख्या 34/3 झाली आहे.
हे ही वाचा -