IND vs AUS T20 Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज, सराव करतानाचे फोटो व्हायरल, पाहा रोहित-पंतचे खास शॉट्स
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून टीम इंडिया कसून सराव करताना दिसत आहे.
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आागामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीला पोहोचले असून सध्या कसून सराव करताना दिसत आहेत. दरम्यान बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे (Team India) सराव करतानाचे फोटो नुकतेच त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भारताचे खेळाडू नेटमध्ये बॅटिंग सराव करत असून बोलिंगचा सरावही करत आहेत. तसंच बॅडमिंटनसारखे इतरही खेळ खेळताना दिसताना आहेत.
यावेळी फोटोंमध्ये भारताचे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल हे देखील दिसून आले आहेत. दोघेही दुखापतीमुळे मागील काही सामने टीम इंडियामध्ये नसल्याचं दिसून आलं. आशिया कपमध्येही दोघे नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत झाली होती. पण दोघेही दुखापतीतून सावरले असून आता विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी सराव करताना दिसत आहेत.
पाहा फोटो
#TeamIndia had their first training session ahead of the #INDvAUS series at the IS Bindra Stadium, Mohali, yesterday.
— BCCI (@BCCI) September 19, 2022
Snapshots from the same 📸📸 pic.twitter.com/h2g0v85ArH
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमेश यादव, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
कधी होणार सामने?
हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान नाणेफेक ही 7 वाजता होणार आहे.
कुठे पाहता येणार सामने?
या तिन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर केले जाणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग Disney+Hotstar Plus या अॅपवर पाहता येणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20/09/2022 | ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 23/09/2022 | विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र |
तिसरा टी-20 सामना | 25/09/2022 | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद |
हे देखील वाचा-