एक्स्प्लोर

IND vs AUS : या खेळाडूंच्या पदरी निराशाच, बीसीसीआयनं पुन्हा डावलले

IND vs AUS : दिल्ली कसोटीनंतर बीसीसीआयने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे.

India Squad Against AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारातने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटीनंतर बीसीसीआयने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याच्यावर बीसीसीआयने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तर दुसरीकडे काही युवा आणि अनुभवी खेळाडू मात्र प्रतिक्षेतच आहेत. अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी मयांक अग्रवाल, उमरान मलिक अथवा सरफराज खान याला संधी मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या खेळाडूंच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. 

सरफराज खान

मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याने गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ज्या ज्या वेळीस भारतीय संघाची निवड होते, तेव्हा तेव्हा सरफराज याच्या नावाची चर्चा होते. पण आज त्याच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या राहुलवर बीसीसीआयने विश्वास दाखवला आहे. तर दुसरीकडे सरफराज खानची प्रतिक्षा मात्र कायम आहे. 

मयांक अग्रवाल

रणजी ट्रॉफी 2023 च्या हंगामात मयांक अग्रवाल याने धावांचा पाऊस पाडला आहे. मयांकच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. मयांकने कर्नाटकसाठी 9 सामन्यात 990 धावांचा पाऊस पडलाय. त्यानंतरही मयांकला संघात स्थान मिळवता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून मयांक भारतीय संघाबाहेर आहे.  

उमरान मलिक

जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यालाही टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याच्या वेगामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले, असे क्रीडा चाहत्यांना वाटत होतं. कारण, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो वेगवान गोलंदाजाची कमी भरुन काढेल, असं वाटत होतं. पण निवडकर्त्यांनी त्याला स्थान दिलं नाही.   

अखेरच्या दोन सामन्यासाठी कोण कोण संघात?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Embed widget