IND vs AUS 3rd T20: पहिल्या चेंडूपासून सामना संपेपर्यंत; भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामन्याचे हायलाइट्स
India vs Australia 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना खेळला जाणार आहे.
LIVE
Background
India vs Australia 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना खेळला जाणार आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतानं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. दरम्यान, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आणखी एका द्विपक्षीय टी-20 मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 25 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, 10 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या अखेरच्या पाच टी-20 सामन्यापैकी भारतानं तीन सामने जिंकले आहेत. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. राजीव गांधी स्टेडियमवर आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले गेले. या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं एक विजय मिळवलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय.या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 209 इतकी आहे. जी भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली होती.
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज (25 सप्टेंबर) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
हे देखील वाचा-