(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kuldeep Yadav On Fire: कुलदीप यादवची आणखी एक हॅट्ट्रिक; न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
India A vs New Zealand A: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा अ संघ भारत दौऱ्यावर आलाय. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळण्यात आला.
India A vs New Zealand A: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा 'अ' संघ भारत दौऱ्यावर आलाय. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय चेन्नईच्या (Chennai) एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium) खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) हॅट्ट्रिक घेऊन ऐतिहासाला गवसणी घातलीय. या सामन्यातील 47व्या षटकातील शेवटच्या सलग तीन चेंडूवर कुलदीपनं न्यूझीलंड 'अ' संघाच्या लोगन व्हॅन बीक (Logan van Beek), जो वॉकर (Joe Walker) आणि जेकब डफी (Jacob Duffy) यांना बाद करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुलदीपच्या नावावर दोन हॅट्ट्रिकची नोंद आहे. याशिवाय, 19 वर्षाखालील विश्वचषकातही स्कॉटलंडविरुद्ध त्यानं हॅट्ट्रीक घेतलीय. म्हणजेच कुलदीप यादवनं एकूण चार वेळा हॅट्ट्रीक घेतलीय.
चेन्नईच्या एमए स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड अ च्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कुलदीप यादवनं 10 षटकात 51 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारत अ संघानं न्यूझीलंडला 47 षटकांत 219 धावांत गुंडाळलं. हा सामना भारतानं चार विकेट्सनं जिंकला. न्यूझीलंड अ संघाच्या डावातील 47 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कुलदीपनं व्हॅन बीकला पृथ्वी शॉकडं झेलबाद केलं. पुढच्याच चेंडूवर जो वॉकरला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर या षटकातील अखेरच्या चेंडूवर जेकब डफीला एलबीडब्ल्यू करून हॅट्ट्रिक पूर्ण केलीय. कुलदीपनं आपल्या स्पेलच्या शेवटच्या षटकात हा पराक्रम केलाय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलदीपच्या नावावर दोन हॅट्ट्रिक नोंद
कुलदीपनं 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिल्यांदा हॅट्ट्रिक घेतलीय. त्यावेळी भारताकडून एकदिवसीय सामन्यात अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्यानंतर 2019 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध आणखी एकदा हॅट्ट्रीक घेऊन विश्वविक्रमाला गवसणी घातलीय.
कुलदीप यादवची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
कुलदीप यादवनं सात कसोटी, 69 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 26 विकेट्स घेतल्या असून दोनवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 112 विकेट्सची नोंद आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 44 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-