एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st Test : गौतम गंभीरची एन्ट्री होताच मराठमोळ्या खेळाडूच्या कारकीर्दीला पूर्णविराम? धोनीचा लाडका टीम इंडियातून साईड लाईन...

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीरने टीम इंडियाची मुख्य प्रशिक्षक म्हणून कमान सांभाळली.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीरने टीम इंडियाची मुख्य प्रशिक्षक म्हणून कमान सांभाळली. भारतीय संघाने जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका होती. गंभीरच्या कार्यकाळातील संघाची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. भारतीय संघाला श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आणि नुकतेच न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारतीय संघाचा क्लीन स्वीप केला. मात्र, टी-20 फॉरमॅटमध्ये संघाची कामगिरी चांगलीच झाली आहे. गंभीरच्या कार्यकाळात अनेक युवा खेळाडूंनीही संघात प्रवेश केला आहे. पण असाही एक खेळाडू आहे ज्याने गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही.

गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाने आतापर्यंत 6 मालिका खेळल्या आहेत. टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर 3 टी-20 आणि 3 वनडे सामने खेळले. यानंतर बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळले गेले. त्याच वेळी, न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका होती आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. मात्र यापैकी एका मालिकेतही युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला खेळण्याची संधी मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड सध्या टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी टीम इंडियाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळले गेले. या दौऱ्यात ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा भाग होता आणि त्याला खेळण्याची संधीही मिळाली. ऋतुराज गायकवाडनेही 4 सामन्यांच्या 3 डावात 66.50 च्या सरासरीने 133 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही.

ऋतुराज गायकवाडची कारकीर्द

ऋतुराज गायकवाडने 2021 साली टी-20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 2022 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी आतापर्यंत 6 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 19.16 च्या सरासरीने 115 धावा आणि 1 अर्धशतक ठोकले आहे. त्याच वेळी, टी-20 मध्ये त्याने 39.56 च्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 143.53 राहिला आहे. त्याने टी-20मध्ये 4 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. त्याने शेवटच्या टी-20 सामन्यात 49 धावांची इनिंग खेळली होती. त्याने या धावा 175.00 च्या स्ट्राइक रेटने केल्या.

याशिवाय ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा कर्णधार बनवले. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 66 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 2380 धावा आहे. ज्यामध्ये 18 अर्धशतके आणि 2 शतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम
खोक्या भाईसाठी बीड पोलिसांचा बिर्याणीचा सुग्रास बेत, मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम अन् भेटीगाठी
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 7AmPrashant koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला, आज कोर्टात सुनावणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 march 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम
खोक्या भाईसाठी बीड पोलिसांचा बिर्याणीचा सुग्रास बेत, मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम अन् भेटीगाठी
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Embed widget