एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

Team India Playing 11 vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु या कसोटीत भारतीय संघ अनेक गोष्टीत संघर्ष करताना दिसत आहे. म्हणजे सलामीवीरांपासून ते मधल्या फळीपर्यंत आणि गोलंदाजीपर्यंत भारतीय संघाचे कॉम्बिनेशन काय असेल याबाबत अनेक प्रश्न आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. 

या कसोटीपूर्वी टीम इंडिया दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येशी झुंजत होती. रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही. शुभमन गिलही अंगठ्याच्या दुखापतीमुळे पर्थ कसोटीतून बाहेर जाणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया पहिल्या कसोटीत कोणते कॉम्बिनेशन मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या सराव सत्रातून समोर आलेल्या फोटोतून संघ कॉम्बिनेशन स्पष्टपणे दिसत आहे. किमान टॉप-6 तरी पुष्टी झालेली दिसत आहे.

टीम इंडियाच्या सराव सत्रात देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. या फोटोवरून असे दिसते की शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळेल तर केएल राहुल यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करेल. ज्युरेल मधल्या फळीत फलंदाज म्हणून खेळू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने प्रभावित केले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे त्याने दोन डावात 80 आणि 68 धावा केल्या. अशा स्थितीत तो संघात विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळू शकतो. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही याचे समर्थन केले आहे. तो या सामन्यात सर्फराज खानची जागा घेऊ शकतो.

पर्थ कसोटीसाठी भारताची प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा,वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर). , आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हे ही वाचा -

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
Ind Squad vs SL T20I Series : 95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
IND vs NZ 2nd Test : LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Maharashtra Live blog updates: डिलिमीटेशन बिलासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांच्यात फोनवर चर्चा; डिलिमीटेशन बिलाला विरोध कायम
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Embed widget