(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा आणि केएल राहुलचे दमदार अर्धशतक
IND vs AFG: या विजयासह भारताने विश्वचषकात विजयाचे खाते उघडले आहे.
टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 33 व्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर (IND vs AFG) 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यावेळी भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 211 धावांचे विशाल आव्हान ठेवले हे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही. आफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 144 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह भारताने विश्वचषकात विजयाचे खाते उघडले.
अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचा आमंत्रण दिले. भारताकडून रोहित शर्मा (47 बॉल 74 धावा), केएल राहुल ( 48 बॉल 69 धावा), रिषभ पंतने नाबाद 13 बॉल 35 धावा तर, हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये 33 धावा ठोकल्या आहेत. ज्यामुळे भारतीय संघाने 20 षटकात 2 विकेट्स गमावून 210 धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांना प्रत्येक एक-एक विकेट्स मिळाली.
IND vs AFG: भारतीय संघाचा अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! पहिल्यांदाच स्पर्धेत 200 हून अधिकचा स्कोर
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या संघाकडून हजरतुल्ला जजई (15 बॉल 13 धावा), मोहम्मद शहजाद (4 बॉल 0 धाव), रहमानउल्ला गुरबाज (10 बॉल 19 धावा), मोहम्मद नबी (35 बॉल 32), नजीबुल्लाह झद्रान (11 बॉल 13), करीम जनात (22 बॉल 42), गुलबदिन नायब (20 बॉल 18), रशीद खान (1 बॉल 0) आणि शराफुद्दीन अश्रफ नाबाद 3 बॉल 2 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक 3 विकेट्सने पटकावले. तर, रविचंद्रन अश्वीनला 2 विकेट्स मिळाले. याशिवाय, जसप्रीस बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
या स्पर्धेत भारताने पहिला विजय मिळवला आहे. याआधी भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, आज अफगाणिस्तानविरुद्ध शेख जायद मैदानात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली आहे.