IND vs NZ 1st Test : '10 रुपये की पेप्सी, अय्यर भाई...,' श्रेयसच्या शतकानंतर कानपूरच्या प्रेक्षकांच्या भन्नाट घोषणा, पाहा VIDEO
न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावल्यानंतर सर्वत्र श्रेयस अय्यरची चर्चा होत आहे. कानपूरच्या प्रेक्षकांनी मैदानात हटके घोषणांनी धुमाकूळ घातला आहे.
IND vs NZ 1st Test: भारत-न्यूझीलंड सामन्यात सर्वाधिक चर्चा होत असलेल्या श्रेयस अय्यरने दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही हवा केली आहे. कानपूरच्या मैदानात सलामीच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावणारा श्रेयस सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियासह देशभरात त्याची इतकी हवा होत असताना ज्याठिकाणी त्याने हे शतक झळकावलं तेथील प्रेक्षकांनी काय धिंगाणा केला असेल. याचा आफण विचारचं करु शकतो. दरम्यान कानपूरच्या मैदानात श्रेयसच्या नावाने घोषणा करणाऱ्यां चाहत्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमधल्या 'दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी' या नाऱ्याने तर सोशल मीडियावर वेगळीच हवा केली आहे. हा व्हिडीओ तुफान वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ कानपूरच्या मैदानातील असून यामधील प्रेक्षक सामना फक्त पाहत नसून एन्जॉय करताना दिसत आहेत.
शतकवीर श्रेयस अय्यर के दीवाने हुए कानपुर बाले
">
"दस रुपये की पैप्सी #अय्यर_भाई_सेक्सी" के जमकर लगे नारे क्या कहते हो @DrKumarVishwas भैया @rjraunac pic.twitter.com/rlGjN8jnS5
श्रेयसचं सलामीच्या सामन्यात शतक
मोठ्या प्रतिक्षेनंतर आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयसने सामन्यात दमदार शतक झळकावलं आहे. अय्यरने 171 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार लगावत 105 धावा केल्या. ज्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला. श्रेयसच्या आतापर्यंतच्या संघर्षाची चर्चाही सर्वत्र होत आहे.
चार वर्षांपूर्वी केला होता डेब्यू
मुंबईत शिक्षण झालेला श्रेयस अय्यर मागील 4 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्याने 1 नोव्हेंबर, 2017 रोजी टी-20 सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 27.61 च्या सरासराने 580 धावा केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन अर्धशतकं लगावली आहेत. 2017 मध्ये श्रेयसने वनडे डेब्यूही केला. श्रीलंका दौऱ्यावर त्याने पहिला सामना खेळला. त्याने 22 एकदिवसीय सामन्यांत 42.78 च्या सरासरीने 813 धावा केल्या आहेत. यात एक शतक त्याने झळकावलं आहे. त्यानंतर आता 4 वर्षांनी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्या सामन्यातचं शतक झळकावलं आहे.
हे ही वाचा
- IND vs NZ 2nd Test At Wankhede: भारत-न्यूझीलंडमधील मुंबईतील कसोटी सामन्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, प्रेक्षकांच्या एन्ट्रीबाबत नव्या सूचना
- India tour of South Africa : भारतीय क्रिकेट संघाच्या आफ्रिका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह?, नव्या व्हेरियन्टमुळे चिंता वाढली
- Shreyas Iyer : अय्यरच्या शतकावर सर्वच आनंदी, रोहित शर्माने शेअर केला डान्स VIDEO
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha