(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवावर विराट कोहली म्हणतो..
न्यूझीलंडच्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारतीय खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडलं. भारतीय फलंदाजांची दोन्ही कसोटीतील कामगिरी निराशाजनक आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
ख्राईस्टचर्च : टीम इंडियाचा न्यझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही दारुण पराभव झाला आहे. या पराभवासह टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने गमावली. कसोटी मालिकेतील खराब कामगिरीबाबत कर्णधार विराट कोहलीने भारतीय फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. आमच्या चुका सुधारण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं विराट कोहलीने भारतीय संघाच्या लाजिरवाण्यावर पराभवावर बोलताना म्हटलं आहे. कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिलाचा व्हाईटवॉश पराभव आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाबाबत भारताकडून कोणतंही कारण दिलं जाणार नाही. फलंदाजांची दोन्ही कसोटीतील कामगिरी निराशाजनक आहे. दोन्ही कसोटीत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, मात्र फलंदाजांची त्यांना साथ नाही मिळाली. भारतीय फलंदाजांनी वारंवार त्याच चुका केल्या. या चुकांमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला, असं विराट कोहलीने म्हटलं.
पुढे कोहलीने म्हटलं की, न्यूझीलंडच्या गोलंदांजी प्रभावी मारा केला. न्यूझीलंडच्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारतीय खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडलं. चांगल्या संघाकडून आमचा पराभव झाला आहे, याची लाज नाही वाटली पाहिजे. आमचं फलंदाजीतील प्रदर्शन खराब होतं हे मान्य करावं लागेल. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकले नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनाही साथ मिळाली नाही.
Ind vs NZ Test | न्यूझीलंडचा भारताला क्लीनस्वीप, टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव
दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि केन विलियम्सनने दोन्ही वेळेस टीम इंडियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. गोलंदाजीसाठी फायदेशीर असलेलेल्या पिचवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे भारतीय फलंदाज बॅकफूटवर दिसले. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र कसोटी मालिकेत संघाची कामगिरी निराशाजनक होती. न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान ठेवण्यात खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे कसोटी मालिकेत आम्ही खराब कामगिरी केली मान्य करावं लागेल, असा विराट कोहलीने सांगितलं.
ख्राईस्टचर्चच्या हेग्ले ओवर मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना अवघ्या तिसऱ्या दिवशीच संपला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 132 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. किवी संघाने हे लक्ष्य सात विकेट्स राखून पार केलं. यात सलामीवीर टॉम लॅथम (52 धावा) आणि टॉम ब्लण्डेल (55 धावा) यांनी महत्त्वपूर्व योगदान दिलं.
याआधी यजमान संघाने भारताला पहिल्या कसोटी सामन्यात दहा विकेट्सनी पराभूत केलं होतं. अशाप्रकारे कसोटी अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताला न्यूझीलंडने मायदेशात 2-0 असं पराभूत केलं. या दौऱ्यातील ट्वेन्टी 20 मालिका भारताने 5-0 अशी जिंकली होती. मात्र त्यानंतर वनडे सामन्यात मात्र 0-3 असा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. आता कसोटी मालिकेतही भारताचा 0-2 असा लाजिरवाणा पराभव झाला.
इतर बातम्या
IND v NZ 1ST Test : वेलिंग्टन कसोटीत भारताचा धुव्वा, न्यूझीलंडचा दहा गडी राखून दणदणीत विजय
ICC Test Ranking | विराट कोहलीला मागे टाकत स्टीव्ह स्मिथची अव्वल स्थानी झेप
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2020 | सोमवार