(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WTC Final : ठरलं! भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, 'द ओव्हल' च्या मैदानात 7 जूनला रंगणार सामना
World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा भारतानं एन्ट्री मिळवली असून यंदा भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.
ICC WTC Final 2023 : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC). या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा भारतानं एन्ट्री मिळवली आहे. यंदा भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध फायनल गमावल्यावर यंदा पुन्हा एकदा भारताला हा चषक जिंकण्याची संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णीत सुटला असला तरी श्रीलंकेला न्यूझीलंडनं पराभूत केल्यामुळे भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी मजबूत स्थितीत असल्याने भारतानं फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
India have set a date with Australia at The Oval for the #WTC23 Final 🔥
— ICC (@ICC) March 13, 2023
More ➡️ https://t.co/en4JKEz34d pic.twitter.com/WezeBkKluj
WTC च्या आगामी दोन्ही हंगामाची फायनल इंग्लंडमध्येच होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होत. स्पर्धेचा पहिला हंगाम WTC 21 इंग्लंडच्याच साऊदम्पटन मैदानात पार पडला होता. त्यानंतर आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC 2023) चा अंतिम सामना 'द ओव्हल' येथे खेळवला जाईल. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (WTC 25) क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात (Lords) पार पडणार आहे. दरम्यान यंदाच्या फायनलचा विचार करता 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. तर यंदाच्या या फायनलमध्ये भारतानं एन्ट्री मिळवली त्यासाठी गुणतालिकेची स्थिती कशी आहे पाहू...
आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 11 | 3 | 5 | 152 | 66.67 |
2. भारत | 10 | 5 | 3 | 127 | 58.08 |
3. दक्षिण आफ्रीका | 8 | 6 | 1 | 100 | 55.56 |
4. श्रीलंका | 5 | 5 | 1 | 64 | 48.48 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
7. वेस्ट इंडीज | 4 | 7 | 2 | 54 | 34.62 |
8. न्यूझीलंड | 3 | 6 | 3 | 48 | 33.33 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
अन् भारताची WTC फायनलमध्ये एन्ट्री
अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना भारतीय संघ खेळला. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. त्यानुसार सामना अनिर्णीत राहिला पण श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सामन्यात श्रीलंकेने आधी 355 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 373 धावा केल्या. मग श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपल्यावर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 8 गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना जिंकला. ज्यामुळे भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला.
हे देखील वाचा-