ICC T-20 Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठी खळबळ... वरुण चक्रवर्तीची 110 स्थानांची 'गरूड झेप'; कर्णधार सूर्याला मोठा धक्का
भारतीय क्रिकेट संघाचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसी क्रमवारीत यावेळी मोठा फटका बसला आहे.
ICC T-20 Rankings : भारतीय क्रिकेट संघाचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसी क्रमवारीत यावेळी मोठा फटका बसला आहे. जिथे तो पहिल्या क्रमांकावर होता, नंतर दुसऱ्या क्रमांकावर आला होता, पण आता त्याला तिथूनही खाली यावे लागले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने 110 स्थानांनी झेप घेतली आहे.
कर्णधार सूर्याला मोठा धक्का
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेदरम्यान आयसीसीने टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रँकिंग 881 आहे. आता सूर्यकुमार यादवच्या जागी इंग्लंडच्या फिल सॉल्टने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग 841 झाले आहे. आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सूर्यकुमार यादव आता खाली आला आहे. यापूर्वी त्याचे रेटिंग 818 होते, ते आता 803 वर आले आहे. एका स्थानाच्या घसरण झाल्यामुळे तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
वरुण चक्रवर्तीची 110 स्थानांची 'गरूड झेप'
आयसीसीने 13 नोव्हेंबर रोजी ताजी क्रमवारी जाहीर केली असून यावेळी टी-20 क्रमवारीत सर्वाधिक बदल दिसून आला आहे. टी-20 बॉलिंग रँकिंगमध्ये टॉप-10 मध्ये फारसा बदल झाला नसला तरी इतर अनेक खेळाडूंनी निश्चितच मोठी झेप घेतली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती 110 स्थानांनी झेप घेत आघाडीवर आहे . वरुणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चेंडूवर चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या आहेत.
Pakistan's star pacer reclaims No. 1 position in the ICC Men's ODI Bowling Rankings 🤩https://t.co/hQnUEyAaD0
— ICC (@ICC) November 13, 2024
वरुण चक्रवर्ती जेव्हापासून टीम इंडियात परतला तेव्हापासून त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे, जी त्याने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही सुरू ठेवली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्ती 110 स्थानांनी झेप घेत हार्दिक पांड्यासोबत संयुक्त 64 व्या स्थानावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीचा रेटिंग पॉइंट 459 आहे. आता त्याच्याकडे रँकिंग आणखी सुधारण्याची उत्तम संधी आहे कारण टीम इंडियाला आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत अजून 2 सामने खेळायचे आहेत.
रवी बिश्नोईनेही घेतली एका स्थानावर झेप
टीम इंडियाचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे तो ताज्या ICC गोलंदाजी क्रमवारीत एका स्थानावर झेप घेण्यासही यशस्वी झाला आहे. बिश्नोई आता 666 रेटिंग गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. सध्या आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान इंग्लंड संघाचा लेगस्पिनर आदिल रशीदच्या नावावर आहे, जो 725 रेटिंग गुणांसह या स्थानावर आहे. याशिवाय वानिंदू हसरंगानेही चार स्थानांनी झेप घेत आता थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हे ही वाचा -