एक्स्प्लोर

बाबर आझमची बादशाहत लवकरच संपुष्टात येणार, शुभमन गिल फक्त दोन पावले दूर

ICC ODI Ranking : विश्वचषक 2023 मध्ये सुरू असलेल्या घमासानमध्ये ICC ने खेळाडूंची अपडेटेड एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे.

ICC ODI Ranking : विश्वचषक 2023 मध्ये सुरू असलेल्या घमासानमध्ये ICC ने खेळाडूंची अपडेटेड एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. अव्वल फलंदाजांच्या क्रमवारीत कमालीची उसळण झाली आहे. अशा स्थितीत प्रथम क्रमांकासाठी स्पर्धा अधिक रंजक बनली आहे. याचाच अर्थ वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची वनडे क्रमवारीतील प्रथम क्रमाकाची राजवट संपुष्टात येताना दिसत आहे. बाबर आझम आणि शुभमन गिल यांच्यातील अंतर आता आणखी कमी झालेय. दोघांमध्ये फक्त दोन गुणांचे अंतर शिल्लक आहे. बाबर आझम 818 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर शुभमन गिल 816 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमची बॅट शांतच आहे. त्याचप्रमाणे नंबर दोनवर असलेल्या शुभमन गिल यालाही अद्याप मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्याचीही बॅट अजूनही शांतच आहे. मात्र, या दोघांमध्ये केवळ 2 गुणांचे अंतर आहे. त्यामुळे आगामी सामन्यात गिल याने मोठी खेळी केल्यास बाबर आझमची बादशाहत संपुष्टात येऊ शकते. 

टॉप 10 मध्ये तीन भारतीय - 

आयसीसी वनडे क्रमवारीत आघाडीच्या 10 खेळाडूंमध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. युवा शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली... टॉप 10 मध्ये आहेत. रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर पोहचलाय तर विराज सातव्या स्थानावर आहे. लोकेश राहुल 20 व्या स्थानावर विराजमान आहे. 

डी कॉक, वॉर्नर आणि क्लासेनही शर्यतीत

बाबर आझम आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 818 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल (816) बाबरपेक्षा फक्त 2 गुणांनी मागे आहे. या दोघांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या जोडीचे कडवे आव्हान आहे. या विश्वचषकात 4 शतके झळकावल्यानंतर क्विंटन डी कॉक 765 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी हेनरिक क्लासेन (741) मोठ्या खेळीमुळे सहाव्या स्थानावर आला आहे. डेविड वॉर्नर 761 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

आघाडीचे दहा फलंदाज - 

बाबर आझम, पाकिस्तान
शुभमन गिल, भारत
क्विंटन डि कॉक, दक्षिण आफ्रिका
डेविड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया
रोहित शर्मा, भारत
हेनरिक क्लासेन, दक्षिण आफ्रिका
विराट कोहली, भारत
हेरी टॅक्टॉर, आयर्लंड
रासी वॅन डर डुसेन दक्षिण आफ्रिका
डेविड मलान, इंग्लंड

आयसीसी क्रमवारीतील आघाडीचे 12 गोलंदाज - 

शाहीन आफ्रिदी, पाकिस्तान - 673 रेटिंग गुण

जोश हेजलवूड, ऑस्ट्रेलिया - 663 रेटिंग गुण

मोहम्मद सिराज, भारत - 656 रेटिंग गुण

केशव महाराज, दक्षिण आफ्रिका - 651 रेटिंग गुण

ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंड - 649 रेटिंग गुण

राशीद खान, अफगाणिस्तान - 648 रेटिंग गुण

कुलदीप यादव, भारत - 646 रेटिंग गुण

मुजीब आर रेहमान, अफगाणिस्तान - 641 रेटिंग गुण

अॅडम झम्पा, ऑस्ट्रेलिाय - 637 रेटिंग गुण

मोहम्मद नबी, अफगाणिस्तान - 631 रेटिंग गुण

जसप्रीत बुमराह, भारत -  629 रेटिंग गुण

मॅट हेनरी, न्यूझीलंड - 619 रेटिंग गुण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget