ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ICC Champions Trophy 2025: भारताचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का नाही यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना बीसीसीआयने पुर्णविराम लावला आहे. भारताचा संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबतचा निर्णय आयसीसीला देखील कळवला आहे.
केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आता ‘हायब्रिड मॉडेलवर’ खेळवली जाऊ शकते. याबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेला नाही. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
🚨 INDIAN GOVERNMENT DENIES. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 9, 2024
- The BCCI has told the ICC it had been advised by the GOI not to send the team to Pakistan for Champions Trophy. (Espncricinfo). pic.twitter.com/KpSio688JA
बीसीसीआयने नकार देताच पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया-
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पीसीबीने टीम इंडिया आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबीचे अध्यक्ष अध्यक्ष मोहसिन नकवी म्हणाले की, आम्ही हायब्रीड मॉडेलची तयारी केलेली नाही. हा प्रस्ताव आम्ही मान्य करण्याच्या स्थितीत नाही. एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात आला होता. पण आता टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळायला तयार नाही, असं मोहसिन नकवी म्हणाले. दरम्यान, टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळण्यास न गेल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नुकसान होणार आहे.
टीम इंडिया दुबईत खेळू शकते सामने
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळू शकते. यापूर्वी श्रीलंकेबाबतही चर्चा झाली होती. मात्र बीसीसीआयने दुबईचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत 8 संघांचा समावेश-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानसह यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.